Madhya Pradesh: 'उल्टा लटका दूंगा...,' मामांच्या सरकारमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याला भरला दम!

Madhya Pradesh News: मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री रामखेलवान पटेल सरकारी अधिकाऱ्याला खुलेआम धमकी देत आहेत.
Ramkhelawan Patel
Ramkhelawan Patel Dainik Gomantak

Madhya Pradesh Minister of Ramkhelawan Patel: मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री रामखेलावान पटेल यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री रामखेलवान पटेल सरकारी अधिकाऱ्याला खुलेआम धमकी देत आहेत. 'उल्टा लटका दूंगा, अगर...' असे म्हणतानाही ऐकू येत आहे.

दरम्यान, अमरपाटन, सतना येथील खाद्य सुरक्षा अधिकारी नीरज विश्वकर्मा (Neeraj Vishwakarma) यांनी आरोप केला की, 'एक ऑपरेटर आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करण्यात आली. मात्र पोलीस (Police) ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांना 5 तास बसवून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, एफआयआरही (FIR) नोंदवण्यात आला नाही.'

Ramkhelawan Patel
क्रूरता ! Madhya Pradeshतील सिंगरौलीमध्ये नराधमाने केला महिलेवर बलात्कार

तसेच, नीरज विश्वकर्मा यांच्या म्हणण्यानुसार, कारवाई न केल्यामुळे सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. त्याचवेळी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी बुधवारी श्योपूर जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला निलंबित केले होते. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना एका आठवड्यात निलंबित करण्याची मुख्यमंत्र्यांची ही तिसरी वेळ आहे. सतना येथील अमरपाटन विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन रामखेलवान पटेल (Ramkhelawan Patel) मंत्री झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com