Madhya Pradesh: भगवान श्री कृष्णाने केली सरपंचाची निवड, वाचा सविस्तर

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शाजापूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सध्या खूप चर्चेत आहे.
lord Krishna
lord Krishna Dainik Gomantak

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सध्या खूप चर्चेत आहे. राज्यात पंचायत निवडणुकीच्या तोंडावर 'कृष्ण भगवानाने' कुडाणा गावात सरपंचाची निवड केली. होय! या ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही निवडणूक न होता सरपंच निवडून आला. (lord krishna elected sarpanch in shajapur madhya pradesh the decision was taken by picking up the slip in the temple)

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाणा आणि वजीरपूर ही दोन गावे ग्रामपंचायत दस्तखेडीपासून वेगळी करुन नवीन पंचायत कुडाणा निर्माण करण्यात आली. येथून सरपंचपदासाठी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीपूर्वी गावात प्रथमच बिनविरोध सरपंच होणार, असा निर्णय संपूर्ण गावाने घेतला. ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी सर्व दावेदारांना भगवान कृष्णाच्या मंदिरात (Temple) एकत्र आणले आणि सर्व 6 उमेदवारांच्या नावाच्या चिट्ट्या तयार केल्या आणि 3 वर्षीय मुलीकडून एक चिट्टी उचलण्यात आली.

lord Krishna
Himachal Pradesh: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कुल्लू येथे रोड शो

उर्वरित उमेदवारांनी माघार घेतली

मुलीने उचललेल्या चिट्टीमध्ये सीताबाई प्रेम नारायण सौराष्ट्र असे नाव दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी सीताबाई प्रेम नारायण यांची सरपंच म्हणून एकमताने निवड केली. तर इतर सर्व उमेदवारांनी तात्काळ तहसील गुलाना येथे जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. कुडाणामध्ये एकूण 1200 मतदार असून एकूण 10 वॉर्ड आहेत. सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून, सरपंचपदासाठी 6 उमेदवार होते. मात्र शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता इथे सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी भोपाळच्या नोना जनपद पंचायतीत जिल्हा सदस्यासाठी हनुमान मंदिरात निर्णय घेण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com