Russian woman with children found living in jungle cave Dainik Gomantak
देश

Russian Women: खतरनाक जंगलात लहान मुलींसह गुफेत राहत होती रशियन महिला, गोव्यातून गाठले कर्नाटक; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

Russian woman cave case: सुरुवातीला महिलेने गुहेतून बाहेर येण्यास नकार दिला होता. पण, येथील धोक्याची माहिती दिल्यानंतर ती बाहेर आली.

Pramod Yadav

कर्नाटक: आपल्याच दोन लहान मुलींसह कर्नाटकच्या घटनदाट जंगलातील गुफेत रशियन महिला वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. गुफेतच छोटेसे घर तयार करुन तिने मुक्काम ठोकला होता. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातील ही घटना आहे. येथील रामतीर्थ पर्वतावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

निना कुटीना उर्फ मोहिनी (४०) असे या रशियन महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत तिच्या प्रेमा (६) आणि आमा (४) वर्षीय मुली देखील आढळून आल्या आहेत. गोवा नंतर गोकर्ण असा प्रवास करुन ती उत्तर कन्नड येथे पोहोचली होती. महिलेला आध्यात्माचे आकर्षण असल्याची माहिती समोर आली आहे.

घनदाट जंगलात धोकादायक टेकडीवर तिने एका गुफेत वास्तव्य करत होती. याठिकाणी तिने एक मूर्ती देखील स्थापन केले होती.

महिला गुफेत ध्यानधारणा आणि योग करुन वेळ व्यतित करायची. गुफेच्या बाहेर कपडे लटकवलेली आढळून आल्यानंतर पोलिसांना शंका आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. सुरुवातील महिलेने माहिती देण्यास नकार दिला पण, महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, तिने तिचा पासपोर्ट आणि व्हिजा हरवला असल्याचे सांगितले.

दरम्यान, तिच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात महिलेचा व्हिजा १७ एप्रिल २०१७ रोजी समाप्त झाल्याचे आढळून आले. याचाच अर्थ असा की गेल्या आठ वर्षापासून अवैध पद्धतीने ती भारतात राहत होती. पोलिसांनी महिलेची रवानगी शंकर प्रसाद फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेत केली आहे. याबाबतची माहिती विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाला दिली आहे. येथून महिलेला पुन्हा रशियात पाठविण्याची तयारी केली जात आहे.

महिला ज्याठिकाणी वास्तव्य करत होती तो परिसर अतिशय धोकादायक असून, याठिकाणी भूस्खलन होण्याचा धोका असतो शिवाय या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर देखील आढळून येतो. पोलिस अधिकारी याबाबत निरीक्षण करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला महिलेने बाहेर येण्यास नकार दिला होता. पण, येथील धोक्याची माहिती दिल्यानंतर ती बाहेर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: थ्रीलर सामन्यात इंग्लंड सरस! लॉर्ड्सवर भारताचा 22 धावांनी पराभव; रवींद्र जडेजाची झुंजार खेळी ठरली एकाकी

Viral Video: थिरकली नागिन, वाजवली बीन! काकाचा हसीनासोबतचा 'डान्स' पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा अनोखा पराक्रम! आता इंग्लंडमध्ये गोलंदाजीतही रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Gopal Ganesh Agarkar: जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहिली, कडव्या लोकांनी टोकाचा विरोध केला, आगरकरांच्या आयुष्यातील 'हा' प्रसंग ठरला मैलाचा दगड

Viral Video: OMG! चक्क तीन वाघ कारमध्ये घुसले; पुढे चालकाने जे केलं, ते पाहून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT