Cyber Crime: 'रिचार्ज पॅक'च्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी!

Goa Police: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने मोठे यश मिळवत डिचोली पोलिसांनी झारखंडमधील कुख्यात जामतारा जिल्ह्यातून एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे.
Goa Police Cyber Crime
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने मोठे यश मिळवत डिचोली पोलिसांनी झारखंडमधील कुख्यात जामतारा जिल्ह्यातून एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीने गोव्यातील एका महिलेची तब्बल 44,340.76 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी बारकाईने तांत्रिक तपास करुन झारखंडमधून आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, डिचोली (Bicholim) येथील अनुषा श्रीकांत वाडकर (वय वर्ष 40) यांनी 18 जून 2025 रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला 'टाटा स्काय'चा अधिकारी असल्याचे भासवले. टाटा स्काय रिचार्ज पॅक सुरु करण्याच्या बहाण्याने त्याने अनुषा वाडकर यांना त्यांची वैयक्तिक बँक खात्याची माहिती (बँकिंग क्रेडेन्शियल्स) शेअर करण्यास प्रवृत्त केले. यानंतर आरोपीने त्यांच्या नकळत बँक खात्यातून 44,340.76/- रुपये फसवून काढून घेतले.

Goa Police Cyber Crime
Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 1.2 कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी कर्नाटकातील 63 वर्षीय व्यक्तीला अटक

या प्रकरणी डिचोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(2), 318(3), 318(4), 319(2) अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता.

पोलिसांची कारवाई आणि तपास

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षक, डिचोलीचे पोलीस निरीक्षक आणि डिचोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पीएसआय रश्मिर परब मातोंडकर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश गावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण गावकर यांचा समावेश होता.

Goa Police Cyber Crime
Cyber Crime: आंतरराष्ट्रीय 'जॉब स्कॅम'चा पर्दाफाश! गोवा पोलिसांची मोठी कारवाई, तीघांना ठोकल्या बेड्या

तपासादरम्यान, तांत्रिक पाळत ठेवून आणि स्थानिक गुप्तचरांचा वापर करुन, तसेच सखोल चौकशीअंती आरोपीचा शोध घेण्यात आला. अथक शोध मोहिमेनंतर झारखंडमधील जामताडा जिल्ह्यातील करमाटार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताराबहाल गावाचा रहिवासी असलेला प्रदीप कुमार मंडल (वय 24 वर्षे, रा. ताराबहाल, जि. जामताडा, झारखंड) याला शोधून काढण्यात आले. त्याला गोव्याला आणण्यात आले आणि डिचोली न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गुन्हे करण्याची पद्धत

हे सायबर ठग फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन पीडितांचे मोबाईल नंबर मिळवतात. त्यानंतर, ते स्वतःला एखाद्या बँकेचे किंवा नामांकित कंपनीचे अधिकारी भासवून पीडितांचा विश्वास संपादन करतात. एकदा विश्वास बसला की, ते ओटीपी (OTP), एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही (CVV) क्रमांक, एटीएम पिन (ATM Pin) इत्यादी माहिती मिळवतात आणि त्याद्वारे फसवणुकीचे व्यवहार करतात.

Goa Police Cyber Crime
Goa Cyber Crime: राज्यात बनावट ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा सुळसुळाट, मंत्री, आमदारांनंतर आता पत्रकार निशाण्यावर; पोलिसांना तपासात अपयश

तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे समोर आले आहे की, हा आरोपी भारतभरातील 50 हून अधिक अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. पुढील तपास डिचोलीचे पोलीस निरीक्षक विजय राणे करत आहेत. या अटकेमुळे सायबर गुन्हेगारीच्या या मोठ्या रॅकेटमधील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी पुन्हा केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com