सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF Recruitment 2021) विविध पदांसाठी भरती BSF
देश

BSF Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुरक्षा दलात संधी

सीमा सुरक्षा दलाने (BSF) कॉन्स्टेबल ते मेकॅनिक पर्यंतच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

सरकारी नोकर्‍या शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) कॉन्स्टेबल ते मेकॅनिक पर्यंतच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अधिकृत पत्रही जारी करण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 110 पदे भरली जातील. या जागा गट ब आणि गट क अंतर्गत असणार आहेत. (Recruitment process has started in Border Security Force)

बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जून 2021 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच बीएसएफ.gov.in वर भेट द्यावी लागेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन केली जात असल्याने उमेदवारांना वेबसाइटद्वारे अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.

भरतीची पूर्ण माहिती

  • ASI ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप C) - 1 जागा

  • ASI प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट C) - 2 जागा

  • CT (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / नर्स) ग्रुप C पोस्ट - 9 जागा

  • HC (पशुवैद्यकीय) ग्रुप C पोस्ट - 20 जागा

  • कॉन्स्टेबल (कॅनालमन) ग्रुप C पोस्ट - 15 जागा

  • SI (स्टाफ नर्स) - 37 जागा

पात्रता

स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बारावीपर्यंतचे शिक्षण तसेच नर्सिंगचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. विज्ञाना विभागातून 12 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार ऑपरेशन थिएटर टेक्निशियन पदासाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, संबंधित उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त ऑपरेशन थिएटरचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ उमेदवाराने Diploma in Medical Laboratory Technology पदविचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांचे किमान दहावी पर्यतचे शिक्षण पूर्ण असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात.

वेतनश्रेणी

  1. SI (स्टाफ नर्स)- 35,400 ते 1,12,400

  2. एसआय ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन (ग्रुप C पोस्ट) - 29,200 ते 92,300 पर्यंत

  3. ASI लॅब टेक्निशियन (ग्रुप C पोस्ट) - 29,200 ते 93,300 पर्यंत

  4. CT (वॉर्ड बॉय / वॉर्ड गर्ल / नानी) ग्रुप C पोस्ट - 21,700 ते 69,100

  5. HC (पशुवैद्यकीय) गट C पोस्ट - रु. 25,500 ते रू. 81,100

  6. कॉन्स्टेबल (कॅनालमन) ग्रुप C पोस्ट - रु. 21,700 ते रु. 69,100

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT