Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत स्टाफ नर्स साठी सरकारी पदांची भरती; असा करा अर्ज

Indian Railway Recruitment 2021
Indian Railway Recruitment 2021

देशात सध्या बरेच लोकं कोरोनामुळे घरी बसले आहेत, कुणाचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे तर कुणाची नोकरी गेली आहे. अशातच रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी ही बातमी अत्यंत मह्त्वाची आहे. कारण पश्चिम रेल्वे विभागानं नर्सिंग स्टाफ पदांसाठी अर्ज मागवले आहे. वेस्टर्न रेल्वे स्टाफ नर्स भरती 2020 पात्र उमेदवारीने पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ www.indianrailways.gov.in वर अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी हजर राहावे लागणार आहे. पश्चिम रेल्वे भरती 2021 चा वॉक-इन-इंटरव्ह्यू येत्या 21 जून 2021 रोजी घेण्यात येणार आहे.(Indian Railway Recruitment 2021 Recruitment for Staff Nurses in Indian Railways )

या भरती मोहिमेमुळे वडोदरा विभाग (WR) विभागीय रेल्वे रुग्णालय, प्रतापनगर, वडोदरा -04 येथे वडोदरा कोविड डिव्हीजनमध्ये पूर्णवेळ तीन महिन्यांच्या कंत्राटी करारान्वये पॅरामेडिकल विभागाअंतर्गत नोकरीच्या 18 जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठीची महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे...

पदाचे नाव:- स्टाफ नर्स

रिक्त पदांची संख्या:- 18

वेतन:- रु 44900 L-7 दाखल भत्त्या सह.

शैक्षणिक पात्रता
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे नोंदणीकृत नर्सिंगचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या  शिवाय जनरल नर्गिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजेच वेस्टर्न रेल्वे स्टाफ नर्स भरती २०२० पात्रता उमेदवाराकडे भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बीएससी नर्सिंगद्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 

असा करा अर्ज
पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीच्या तारखेस नमूद केलेल्या जागेवर उपस्थित रहावे, तसेच फॉरमॅट मध्ये दिलेल्या अर्जासह, आवश्यक ते प्रमाणित कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे. मुलाखत दरम्यान पडताळणीसाठी ओरिजिनल प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. सोबत येताना नोकरीसाठीचा अर्ज (फॉर्म) आणि अटेस्टेड कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि त्यांच्या मुळ प्रती सोबत आणने गरजेचं आहे.

मुलाखतीचे ठिकाणः- विभागीय रेल्वे रुग्णालय, प्रतापनगर, वडोदरा - 04

मुलाखतीची वेळ :-
सकाळी 10 ते सायंकाळी 5

नोंदणीसाठीची वेळ :-
सकाळी 9 ते दुपारी 12

मुलाखतीची तारीख :-
21 जून 2021

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com