नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या मालकीच्या सहाय्यक नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (Nabcons) वरिष्ठ व मध्यम-स्तरीय सल्लागार तसेच फिल्ड एन्युमरेटर भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. या भरती मोहिमेमध्ये नाबार्डच्या कृषी क्षेत्र विकास विभागांतर्गत “आदिवासी विकास प्रकल्प” हाताळण्यासाठी 86 रिक्त पदे आणि 24 क्षेत्रीय कार्यालये व मुख्यालय, मुंबई येथे भरली जाणार आहे. इच्छूक उमेदवार Nabcons च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 10 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात www.nabcons.com. (Apply for NABARD Nabcons Recruitment 2021)
नॅबकॉन्स ही नाबार्डची संपूर्ण मालकीची कंपनी आहे आणि कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातली एक प्रमुख सल्लागार संस्था आहे. या लिंकवर जावून http://www.nabcons.com/ तुम्ही जाहीरातीचे नोटिफिकेशन बघू शकता.
वरिष्ठ पातळी सल्लागार: 2 पोस्ट
मध्यम-स्तरीय सल्लागार: 21 पोस्ट
एन्युमरेटर: 63 पोस्ट
पात्रता
वरिष्ठ पातळी सल्लागाराला 2 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट असावे किंवा 4 वर्षाहून अधिक अनुभव असावा.
मध्यम-स्तरीय सल्लागार पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट असणे आवश्यक आहे परंतु कमीतकमी 1 वर्षाचा अनुभव असावा
फील्ड एन्युमरेटरला किमान 1-2 वर्षाचा अनुभव असणे आणि पदवीधर असणे गरजेचं आहे.
वय मर्यादा
वरिष्ठ पातळी सल्लागाराचे वय किमान 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे
मध्यम-स्तरीय सल्लागाराचे वय किमान 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.
फील्ड एन्युमरेटर - किमान वय 24 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावे.
या वेबसाइटवर जावून आपण अर्ज करू शकता
वरिष्ठ स्तर सल्लागार- https://forms.gle/e79TgsMVJ1cTn5xk7
मध्यम-स्तरीय सल्लागार https://forms.gle/cWPjoNK6z4msaA17A
फील्ड एन्युमरेटर - https://forms.gle/GUy2Hmk5fH77WKeS6
अशी असणार निवड प्रक्रिया
प्राप्त झालेले अर्ज शॉर्टलिस्टि केल्यानंतर नाबकॉन उमेदवारंना मुलाखतीसाठी बोलावतील. मुलाखत फेरीनंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कंपनीकडून कॉल लेटर प्राप्त होतील. कॉल आणि लेटरमध्ये नमूद केलेल्या जागेच्या आधारे त्यांना दुसर्या मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
असे असणार वेतन
वरिष्ठ स्तरीय सल्लागार - दरमहा 51,000 - 60,000 रुपये
मध्यम स्तरीय सल्लागार - दरमहा 41,000 - 50,000
फिल्ड एन्युमरेटर- दरमहा 20,000 - 25,000
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.