Recruitment for Consultant Posts in 7DGCA

 

Dainik Gomantak

देश

7th-DGCAमध्ये सल्लागार पदांसाठी भरती; 75000 पर्यंत मिळणार पगार

7DGCA सल्लागार भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन भरावा लागेल आणि तो DGCA च्या भर्ती विभागाच्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

दैनिक गोमन्तक

7DGCA Recruitment 2021: डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने सल्लागार पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सल्लागारांच्या पदांसाठी ही भरती एक वर्षासाठी असेल, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांचे वय कमाल 65 वर्षे असावे अशी अट देण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, सल्लागार भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे. यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज (Recruitment) भरावा लागेल आणि तो DGCA च्या भर्ती विभागाच्या पत्त्यावर पाठवावा लागेल. हवाई पात्रता संचालनालयातून निवृत्त झालेले उपसंचालक पदाच्या खालचे कर्मचारीही या पदासाठी अर्ज करू शकतात.

DGCA सल्लागार भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. एरोनॉटिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बॅचलर पदवीधारक देखील अर्ज करू शकतात. तसेच यासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या उमेदवारांना एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर्स लायसन्सची आवश्यकता नाही. याशिवाय उमेदवारांना विमान देखभालीचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

DGCA मध्ये सल्लागार पदावर भरती झाल्यानंतर, उमेदवारांना दरमहा 75000 रुपये मासिक वेतन मिळेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मूळ वेतनानुसार जोडले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT