मोदींनी घेतलेल्या बैठकीला विरोधकांनी दाखवली पाठ

या बैठकीत राजनाथ सिंह (Rajnath Singh), निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
PM Narendra Modi 

PM Narendra Modi 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि चालू हिवाळी अधिवेशनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक (Meeting) आयोजित केली. या बैठकीत राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi&nbsp;</p></div>
Weather Update: देशात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी

विरोधी पक्षांनी मात्र याकडे पाठ फिरवली. "सरकारने (Government) बोलावलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही. आम्ही गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांच्या राजीनाम्याची आणि राज्यसभेतील 12 विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करतोय. आम्ही संसदेची दोन्ही सभागृहे चालू देणार नाही," असे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

लखीमपूर खेरी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबाबत व 12 विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत रणनीती आखण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या नेत्यांची आजची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलवली होती.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi&nbsp;</p></div>
देशात आजपासून या 6 विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणीचे प्री-बुकिंग अनिवार्य

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी काँग्रेस, TMC, शिवसेना, CPI, CPI(M) या 5 राजकीय पक्षांच्या राज्यसभा खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर सर्व खासदार संसदेतील गांधी पुतळ्यासमोर दररोज धरणे करत आहेत.

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज अनेकवेळा थांबले. संसदेचे हिवाळी अधिवेशन 23 डिसेंबरला संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com