केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी : अरविंद केजरीवाल

केंद्र सरकारला (Central Government) बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

Dainik Gomantak 

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. यातच आता कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) हात पाय पसरु लागला आहे. त्यामुळे केंद्र सराकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पाश्वभूमीवर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे की, Omicron संदर्भात DDMA ची दिल्लीत बैठक झाली आहे. Omicron ची लक्षणे अतिशय सौम्य आहेत आणि मृत्यूची शक्यता कमी आहे. दिल्लीकरांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. ते पुढे म्हणाले की, आम्ही ओमिक्रॉनशी लढण्यास तयार आहोत. केंद्र सरकारला (Central Government) बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी. हॉस्पिटल, ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशनची सर्वाधिक गरज असेल. 23 डिसेंबर रोजी होम आयसोलेशन व्यवस्थापनावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काल 100 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता दिल्लीत (Delhi) येणाऱ्या सर्व कोरोना रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल आणि ओमिक्रॉनची लक्षणेही तपासली जातील.

<div class="paragraphs"><p>Arvind Kejriwal</p></div>
मोदींनी घेतलेल्या बैठकीला विरोधकांनी दाखवली पाठ

अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले, मंत्रिमंडळात आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनची मुदत 31 मे पर्यंत 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. तसेच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षक विद्यापीठ करण्याचा निर्णय झाला, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे, येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ते आणले जाईल, असेही ते म्हणाले. यातून नवीन पिढीचे शिक्षक तयार होतील. त्याचे प्रवेश 2022-23 सत्रात सुरु होतील. यासाठी आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सहयोग करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com