Rajnath Singh called dialogue of Pushpa film for Uttarakhand CM Pushkar Singh Dhami Dainik Gomantak
देश

Video: राजनाथ सिंहांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसाठी मारला 'पुष्पाचा' डायलॉग

'आपला पुष्कर फ्लॉवर भी है और फायर भी ' संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'पुष्कर'साठी मारला पुष्पाचा डायलॉग

दैनिक गोमन्तक

उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांनी राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election 2022) पूर्ण ताकद लावली आहे. मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात प्रचाराला उधाण आले आहे. स्टार प्रचारकांची या राज्यांमध्ये येजा सुरू झाली आहे. या प्रचारादरम्यान काही राजकीय नेत्यांवर हल्लेही होत आहे.

दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट 'पुष्पा' सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होत असली तरी आता तो राजकारणाच्या गल्लीतही पोहोचला आहे. कदाचित त्यामुळेच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या चित्रपटातील डायलॉगचा उल्लेख करण्यापासून दूर ठेवू शकले नाहीत.

दरम्यान आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाट येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. सबका साथ, सबका विश्वास हा भाजपचा नारा असून आपला विकास आणि सर्वांचा अविश्‍वास हा काँग्रेसचा नारा आहे. अस म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 'आजकाल पुष्पा या चित्रपटाच्या नावाची खूप चर्चा आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे नाव पुष्कर आहे, पण पुष्कर हे नाव ऐकून काँग्रेसच्या लोकांना ते फूल आहे असे वाटते पण मला त्यांना सांगायचे आहे की, आपला पुष्कर एक फूल पण आहे आणि फायर पण आहे. आमचा पुष्कर कधीही झुकणार नाही, थांबणार नाही,' असे म्हणत राजनाथ सिंह यांनी पुष्पा चित्रपटाचा फेमस डायलॉग वापरून मुख्यमंत्री पुष्कर यांना मत देण्याचे आवाहन जनतेला केले.

'मी काँग्रेसच्या संदर्भात सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे ना कोणते धोरण आहे, ना त्यांचा कोणताही हेतू आहे आणि त्यांच्या विकासावर जनतेला विश्वास नाही. काँग्रेसने नेहमीच देश आणि राज्याची लूट केली आहे. आम्ही उत्तराखंडला यापुढे झुकू देणार नाही, असे निवडणुकीच्या प्रचारसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

SCROLL FOR NEXT