काँग्रेसने गोव्यात पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर अन्याय केला

लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांना गोवा आकाशवाणीवरून काढून टाकण्यात आले होते त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी आकाशवाणीवर वीर सावरकरांची कविता सादर केली होती.
PM Narendra Modi said Congress did injustice Pt Hridaynath Mangeshkar in Goa
PM Narendra Modi said Congress did injustice Pt Hridaynath Mangeshkar in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत मांडले. काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत त्यांनी काँग्रेस सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला. या दरम्यान त्यांनी गोवा (Goa Politics) आणि पंजाबच्या राजकारणाचाही उल्लेख केला.

'गोव्याच्या गुलामगिरीला काँग्रेसच जबाबदार'

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात गोव्याचा विशेष उल्लेख केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्याला आणखी 15 वर्षे गुलामगिरीत राहावे लागले तर त्याचे कारण काँग्रेस (Congress) सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप केले. कारण गोव्यात सत्याग्रहींवर परकीय गोळीबार करत असताना पं.नेहरूंनी मी सैन्य पाठवणार नाही असे सांगितले होते. त्यांनी सत्याग्रहींना मदत करण्यास नकार दिला. या सर्व प्रसंगाला मोदींनी गोव्यावर केलेले अत्याचार असे संबोधले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लताजींच्या कुटुंबाचा उल्लेख करण्यात आला

यानंतरच पीएम मोदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलले आणि सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्हाला मोठे भाषणही दिले गेले. येथे पुन्हा गोव्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मला गोव्यातीलच एका मुलाची घटना नमूद करायची आहे. लताजींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. लताजींचे कुटुंब गोव्याचे आहे. काँग्रेसने त्यांच्या कुटुंबाचे गोव्यात काय केले हेही देशाला कळले पाहिजे.'

PM Narendra Modi said Congress did injustice Pt Hridaynath Mangeshkar in Goa
गोव्यासह भारतातील ही 6 राज्ये पर्यटनासाठी सुरक्षित; दुसऱ्या डोससह 100% लसवंत

'काँग्रेसने लताजींच्या भावावर अत्याचार केले'

पीएम मोदी म्हणाले, 'गोव्याच्या मातीचे सुपुत्र असलेल्या लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांना गोवा आकाशवाणीवरून काढून टाकण्यात आले. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी आकाशवाणीवर वीर सावरकरांची देशप्रेमाने भरलेली कविता सादर केली. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते सावरकरजींना भेटले आणि म्हणाले की, मला तुमचे गाणे गायचे आहे, तेव्हा सावरकरजी म्हणाले की, 'माझी कविता गाऊन तुला तुरुंगात जायचे आहे?'. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांची कविता संगीतबद्ध केली आणि 8 दिवसातच त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकण्यात आले.

PM Narendra Modi said Congress did injustice Pt Hridaynath Mangeshkar in Goa
निवडणूक असलेल्या 5 राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ

'काँग्रेस सरकारच्या अत्याचारांची यादी लांबली'

'काँग्रेस सरकारमध्ये कसे अत्याचार झाले जगाला कळणे गरजेचे आहे. फक्त हृदयनाथ मंगेशकरांसोबतच नाही तर असे अनेक प्रसंग आहे जिथए कॉंग्रेसने केलेला अन्याय दिसून येतो. त्याची यादी खूप मोठी आहे. पं.नेहरूंवर टीका केल्याबद्दल मजरूह सुलतानपुरी यांना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. पं.नेहरूंवर टीका केल्यामुळे प्राध्यापक धरमपाल यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकार किशोर कुमार यांनाही आणीबाणीत इंदिराजींना नमन न केल्याबद्दल, आणीबाणीच्या बाजूने न बोलल्याबद्दल काढून टाकण्यात आले होते. जेव्हा कोणी एका विशिष्ट कुटुंबाविरुद्ध किंचितही आवाज उठवतो तेव्हा सीताराम येचुरी यांचे काय झाले हे आपल्याला माहिती आहे, असे ठळक मुद्दे उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com