फिरोजपूर:एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेल्या कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं. तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरलेली असतानाच आता क्रिकेटच्या मैदानावरून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात गुरुहर सहाये परिसरातील डीएव्ही स्कूलच्या मैदानावर रविवारी झालेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यात एका युवा क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
मृत फलंदाजाचे नाव हरजीत सिंग (वय अंदाजे ३०) असे असून, तो सुतारकामाचा व्यवसाय करत होता. रविवारी सकाळी सुरु असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यात तो ४९ धावांवर दमदार फलंदाजी करत होता. मात्र काही क्षणांतच हरजीत अचानक जमिनीवर कोसळला. त्याचे सहकारी खेळाडू तातडीने मदतीसाठी त्याच्याकडे धावले, पण काही उपयोग झाला नाही.
सहकाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय मदत बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत हरजीतचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या घटनेची आठवण मुंबईत घडलेल्या एका अशाच प्रकरणाची करून देते. जून २०२४ मध्ये मुंबईतील एका परिसरात एका बॉक्स क्रिकेट सामन्यात एका तरुणाने षटकार मारल्यानंतर मैदानातच कोसळून प्राण गमावले होते. ही घटना सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती.
क्रिकेटसारख्या खेळात अत्यंत उत्साही आणि तरुण वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असतो. अशा काळात अशा घटना चिंता वाढवणाऱ्या ठरतात. देशभरात तरुणांमध्ये वाढणारी हृदयविकाराची प्रकरणं हा एक गंभीर विषय बनला आहे. तणावपूर्ण जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी न होणे, ही यामागची काही कारणं मानली जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.