Goa Politics: 'गोव्यात आल्यानंतर गावडेंचे म्हणणे जाणून घेतले होते'! दामूंचा गौप्यस्फोट; वारंवार सांगूनही वादग्रस्त वक्तव्ये होती सुरु

Damu Naik: नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या सांगण्यावरून गावडेंना समज दिली होती. मात्र, त्याची वाच्यता मी आजवर केली नव्हती.
Damu Naik, Govind Gaude
Damu Naik, Govind GaudeX
Published on
Updated on

पणजी: ‘तुमची जीभ आवरा’ अशी वारंवार समज दिल्यानंतरही माजी मंत्री गोविंद गावडे यांनी वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले होते. फोंडा येथील प्रेरणा दिन कार्यक्रमापूर्वीही त्यांना इशारा दिला होता, असा गौप्यस्फोट आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.

नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या सांगण्यावरून गावडेंना समज दिली होती. मात्र, त्याची वाच्यता मी आजवर केली नव्हती.

दामू म्हणाले, की सदानंद शेट तानावडे प्रदेशाध्यक्ष असताना गावडे यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानेही त्यांना त्यावेळी समज दिली होती. त्यावरून त्यांना तसे बोलण्याची सवयच असावी.

गावडे यांच्या २४ मे रोजीच्या वक्तव्याची दखल दिल्लीत घेण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मला त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी गोव्यात गेल्यावर माहिती घेतो, असे मी सांगितले होते.

दरम्यानच्या काळात मी व्हिडिओ पाहिला, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली, सर्वांकडून माहिती घेतली. त्यावरून गावडे चुकले, असे मत तयार झाले.

म्हणणे जाणून घेतले नाही, हे निखालस खोटे

फोंड्यातील भाषणानंतर आपले म्हणणे जाणून घेतले नाही, असे गावडे म्हणत असल्यास ते निखालस खोटे आहे. त्यांनीच जाहीरपणे तसे सांगितल्याने आज सांगतो, गोव्यात आल्यानंतर मी गावडे यांना मडगावला बोलावून घेतले होते. मडगावला भाजपच्या कार्यालयात सहाव्या मजल्यावर त्यांचे सविस्तर म्हणणे जाणून घेतले होते. त्याआधारे अहवाल देतो, असेही मी त्यांना सांगितले होते. २४ मे रोजी वक्तव्य केले आणि १८ जून रोजी कारवाई झाली. या दरम्यानच्या २४ दिवसांत काय झाले याची माहिती त्यांनी करून घ्यावी व जबाबदारीने वक्तव्य करावे, असेही दामू यांनी सांगितले होते.

‘ते’ वक्तव्य पक्षावर शिंतोडे उडविणारे

मला माध्यमांकडून विचारणा झाल्यावर ‘कोणी उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करू नये, गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार, असे नमूद केले. ते विधान मी पूर्ण जबाबदारीने केले होते. मी व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यात गैरव्यवहार होतो, असा आरोप एक मंत्री जाहीरपणे कसा काय करू शकतो, असा प्रश्न पडला. त्याशिवाय पक्षातील इतर सहकाऱ्यांचेही सरकार आणि पक्षावर शिंतोडे उडवणारे असे गावडे यांचे ते भाषण होते, असे मत पडले. माझे तेव्हाही तसेच मत होते व आजही आहे.

संतोष यांच्याशी भेट घडविली होती

माजी मंत्री गावडे यांनी, आपल्याला पक्षाच्या नेतृत्वाला भेटू दिले जात नसल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी मी बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा करून भेटीची वेळ मिळवून दिली होती. त्यावेळी गावडे दिल्लीत जाऊन संतोष यांना भेटले अशी माझी माहिती आहे, असे दामू यांनी सांगितले.

Damu Naik, Govind Gaude
Goa Politics: "ते खोटं बोलतायेत, त्यांना वारंवार समज दिली होती"; प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांचा गोविंद गावडेंना राजकारण न करण्याचा सल्ला

वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांतून बोध नाहीच

१. गावडे यांच्याबाबत हे एकदाच झालेले नाही. प्रदेशाध्यक्ष पदाची मी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रियोळ मतदारसंघात पक्षाचा मेळावा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावडे यांनी ढवळीकर यांच्याविरोधात वक्तव्ये केली. मगोप युतीत असताना सरकारमधील एका मंत्र्याने जाहीरपणे असे बोलणे युती धर्माच्या विरोधात होते.

Damu Naik, Govind Gaude
Govind Gaude: हस्तांदोलन झालं, पण संवाद नाही! मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर गावडे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर

2. त्या विषयाचीही दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली होती. मला गावडे यांना समज देण्यास संतोष यांनी सांगितले. गावडे असे वारंवार करत आहेत, असेही ते म्हणाले होते. मी गावडे यांना पणजीतील भाजप कार्यालयात बोलावून ‘जीभ आवरा’ अशी समज दिली होती. त्यातून त्यांनी काहीही बोध घेतला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com