Temple In Dubai 
देश

Viral Video: विशाल वास्तू आणि कलेची छाप, पाहा अबू धाबीतील हिंदू मंदिराची झलक

Ashutosh Masgaunde

Prime Minister Modi will inaugurate a Hindu temple in Abu Dhabi on February 14, watch video:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-14 फेब्रुवारी रोजी UAE दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.

पीएम मोदींच्या UAE दौऱ्यापूर्वी UAE मधील भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी या मंदिराविषयी सांगितले की, हे मंदिर भारत आणि आखाती प्रदेशातील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध मजबूत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्यांदा यूएईला भेट देणार आहेत.

UAE मधील भारताचे राजदूत सुधीर म्हणाले की, या मंदिराचे बांधकाम ज्या प्रमाणात केले जात आहे ती या मंदिराची खास गोष्ट आहे. नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर हे मंदिर उभारले आहे, अशीही वस्तुस्थिती आहे.

ते म्हणाले की, जागतिक महामारीसह कोरोनासारख्या अनेक आव्हानांना तोंड देत हे मंदिर एक विशाल वास्तू, कलेचे उदाहरण आणि वसुधैव कुटुंबकम या तत्त्वाच्या सामायिक मूल्यांचे प्रतीक बनत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारीला अबुधाबीला पोहोचणार आहेत. जिथे ते भारतीय समुदायातील लोकांच्या 'अहलान मोदी' कार्यक्रमात सहभागी होतील.

अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला हजारो लोकांनी नोंदणी केली आहे.

अबुधाबीच्या BAPS मंदिराचे प्रमुख ब्रह्मविहारीदास स्वामी म्हणाले की, या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी खास पंतप्रधान मोदी येत आहेत. या मंदिराचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले आहे. हे मंदिर 27 एकर जागेवर बांधले आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने अबू धाबीतील पहिले हिंदू मंदिर, बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिराचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराची झलक दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT