Pakistan Hindu Temple: कॉफी हाऊस बांधण्यासाठी पाकिस्तानात तोडले हिंदू मंदिर!

Pakistan Hindu Temple Demolished: पाकिस्तानात अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, याचे पुन्हा एकदा उदाहरण समोर आले आहे.
Pakistan Hindu Temple Demolished
Pakistan Hindu Temple DemolishedDainik Gomantak

Pakistan Hindu Temple Demolished: पाकिस्तानात अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, याचे पुन्हा एकदा उदाहरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील मिठी शहरात एक हिंदू मंदिर पाडण्यात आले आहे. हिंगलाज माता मंदिर उद्ध्वस्त करण्याचा आदेश कोर्टाकडून प्राप्त झाला होता, त्याचे पालन करण्यात आले आहे, असे थारपारकर जिल्हा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेजवळील शारदा पीठ मंदिराचा एक भागही पाडल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बंदी घातली असतानाच मंदिर पाडण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला. कॉफी हाऊस बांधण्यासाठी हे पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या नवीन कॉफी हाऊसचे उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

या वर्षी जुलैमध्ये इस्लामिक देशाने (पाकिस्तान) आणखी एक हिंदू मंदिर 'जुनी आणि धोकादायक संरचना' घोषित करुन पाडले होते. यानंतर कराचीतील सोल्जर बझारमध्ये असलेल्या मरी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आला. अशा प्रकारे मोठ्या पोलीस बंदोबस्तात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या.

Pakistan Hindu Temple Demolished
Pakistan: बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानची कडक कारवाई

मरी माता मंदिर जुलैमध्ये पाडण्यात आले

मरी माता मंदिर 150 वर्षांपूर्वी बांधले गेले होते आणि ते सुमारे 400 ते 500 स्क्वेअर यार्डच्या परिसरात पसरले होते. या मंदिराची जमीन हडप करण्यासाठी बिल्डरांचा बराच काळ डोळा होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अखेर या लोकांचा नापाक हेतू सफल झाला आणि मंदिर पाडण्यात आले.

हे ज्ञात आहे की, कराची हे शहर विविध प्राचीन हिंदू मंदिरांचे केंद्र राहिले आहे. हे शहर पाकिस्तानमधील हिंदूंचे अस्तित्व दर्शवते. विशेषतः सिंध प्रांतात राहणारे हिंदू लोक मुस्लिम रहिवाशांसह संस्कृती, परंपरा आणि भाषा सामायिक करतात.

हिंदूंवरील (Hindu) अत्याचाराची अनेक प्रकरणे इथे उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये टार्गेट किलिंग आणि जमिनीवरील अतिक्रमण प्रमुख आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com