POCO M7 5G Specifications
पोकोने भारतात आणखी एक स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या पोको एम७ प्रोचा स्टँडर्ड मॉडेल आहे. पोकोचा हा स्वस्त ५जी स्मार्टफोन दमदार वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे.
९९९९ रूपये किंमत असलेला पोको एम७ ५जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्ले, तसेच अल्ट्रा-स्मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्मार्टफोन आहे. मनसोक्त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्यायचा असो पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो.
स्नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेटची शक्ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सुलभ, विनाव्यत्यय कार्यक्षमता देतो. आकर्षक क्षणांना कॅप्चर करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ५० मेगापिक्सल सोनी सेन्सर अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक फोटो कॅप्चर करतो.
पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, “भारतातील स्मार्टफोन बाजारपेठ विकसित होत आहे आणि आज वापरकर्ते तडजोड न करता अधिक मूल्याची अपेक्षा करतात. पोको एम७ ५जी किफायतशीर दरामध्ये फ्लॅगशिप कार्यक्षमता, आकर्षक डिस्प्ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो.
या लाँचसह आम्ही स्मार्टफोन ऑफर करण्यासोबत भारतातील आधुनिक काळातील ग्राहकांसाठी किफायतशीर स्मार्टफोन अनुभवाला नव्या उंचीवर देखील घेऊन जात आहोत.''
स्नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम
सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्ले
५० मेगापिक्सल सोनी सेन्सर
५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्स चार्जर)
५जी कनेक्टीव्हिटी.
पोको एम७ ५जी कमी दरात लाँच करण्यात आला आहे. फक्त ९,९९९ रूपयांमध्ये ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्ट, १०,९९९ रूपयांमध्ये ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट खरेदी करता येणार आहे.
फक्त पहिल्या दिवशी वरील स्पेशल किमतींचा लाभ घेता येणार आहे. पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून फक्त फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. हा फोन मिंट ग्रीन, ओशन ब्लू आणि स्टोन ब्लॅक रंग पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.