Mobile Fake Call : सावधान! +९२ या क्रमांकावरील कॉल्स घेऊ नका; अन्यथा फसाल

Mobile Fake Call : मंगळवारी कुडचडे येथे दोघांना असा अनुभव आला. मंगळवारी दुपारी त्या व्यक्तीला +92 या क्रमांकावरून एका फोन आला. त्यांनी तो घेतला असता, आम्ही सीबीआयचे अधिकारी बोलत आहोत, तुमच्या मुलाला आम्ही ड्रग्स रॅकेटमध्ये अटक केली आहे.
fake call
fake callDainik Gomantak
Published on
Updated on

Mobile Fake Call :

मडगाव, +92 या क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉल्सविषयी अतिशय जागरूक रहा. असे फोन घेऊ नका; कारण खोटी माहिती देऊन ते तुम्हाला फसवू शकतात, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कारण हे फोन पाकिस्तानमधून केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

मंगळवारी कुडचडे येथे दोघांना असा अनुभव आला. मंगळवारी दुपारी त्या व्यक्तीला +92 या क्रमांकावरून एका फोन आला. त्यांनी तो घेतला असता, आम्ही सीबीआयचे अधिकारी बोलत आहोत, तुमच्या मुलाला आम्ही ड्रग्स रॅकेटमध्ये अटक केली आहे. त्याला सोडवायचे असेल तर अमूक अमूक रक्कम आम्ही दिलेल्या क्रमांकावर भरा, असा संदेश दिला गेला. हा संदेश देणाऱ्या व्यक्ती अस्खलित हिंदी भाषेत बोलत होत्या.

मात्र, त्या व्यक्तीचा मुलगा कुडचडेतच बारावीत शिकत होता आणि आपल्या मुलाला स्कूलमध्ये सोडून तो आला होता. त्यामुळे खोदून खोदून प्रश्र्न विचारल्यावर पलीकडून फोन बंद करण्यात आला.

fake call
South Goa: दक्षिणेत ख्रिश्चन पाद्रींमुळेच पल्लवी धेंपेंचा पराभव, भाजप नेत्यांचा दावा; विरोधात मतदानाचा होता आरोप

मंगळवारी कुडचडे येथे दोघांना असा अनुभव आला. मंगळवारी दुपारी त्या व्यक्तीला +92 या क्रमांकावरून एका फोन आला. त्यांनी तो घेतला असता, आम्ही सीबीआयचे अधिकारी बोलत आहोत, तुमच्या मुलाला आम्ही ड्रग्स रॅकेटमध्ये अटक केली आहे. त्याला सोडवायचे असेल तर अमूक अमूक रक्कम आम्ही दिलेल्या क्रमांकावर भरा, असा संदेश दिला गेला. हा संदेश देणाऱ्या व्यक्ती अस्खलित हिंदी भाषेत बोलत होत्या.

मात्र, त्या व्यक्तीचा मुलगा कुडचडेतच बारावीत शिकत होता आणि आपल्या मुलाला स्कूलमध्ये सोडून तो आला होता. त्यामुळे खोदून खोदून प्रश्र्न विचारल्यावर पलीकडून फोन बंद करण्यात आला.

...तर ११२ क्रमांकावर तक्रार नोंदवा!

हे दोन्ही फोन पाकिस्तानमधून आले होते, हे पोलिसांनी तपास केल्यावर समजले. या दोन घटना घडल्यावर दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी लोकांना सतर्क करताना +92 क्रमांकावरून फोन आल्यास ते घेऊ नका, असे आवाहन केले. असे फोन आल्यास जवळच्या पोलिस स्थानकावर त्याची माहिती द्या किंवा ११२ क्रमांकावर फोन करून तक्रार करा, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fake call centers in Goa
goa crime branch busts two fake call centers
Saligao Police Raid
goa cyber crime raid fake call centre karmali arrests us citizens loan fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com