Sameer Amunekar
तुमच्या फोनसाठी योग्य असलेल्या फास्ट चार्जिंग अॅडॉप्टरचा वापर करा. फक्त ब्रँडेड आणि अधिकृत चार्जर वापरणे चांगले राहिलं.
खराब किंवा डुप्लिकेट केबल चार्जिंग स्लो करू शकते. USB Type-C किंवा ओरिजिनल केबल वापरणे फायदेशीर ठरेल.
गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग केल्यास चार्जिंग वेळ वाढतो. शक्य असल्यास एरोप्लेन मोडमध्ये ठेवा.
चार्जिंग पोर्टमध्ये धूळ गेल्यास चार्जिंग स्लो होते. वेळोवेळी साफसूफ करा आणि स्वच्छ ठेवा.
अनावश्यक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू असल्यास चार्जिंग स्लो होते. Settings > Battery Usage तपासा आणि अॅप्स बंद करा.
जुन्या फोनची बॅटरी खराब झाल्यास चार्जिंग स्लो होतो. बॅटरी खऱाब झाली आहे का हे तपासा. गरज असल्यास बॅटरी बदला.