Ecommerce| E-retail Market India Dainik Gomantak
देश

NITI Aayog: थाटात जगण्यावर जोर! अन्नावर कमी अन्क पडे, मनोरंजनावर भारतीयांचा सर्वाधिक खर्च

MPCE: गैर-खाद्य वस्तूंव्यतिरिक्त, खेड्यांमध्ये सर्वाधिक खर्च प्रवासावर 285 रुपये आणि वैद्यकीय खर्चावर 269 रुपये आहे.

Ashutosh Masgaunde

People in the country are spending less on food and more on clothes, entertainment and other things, According to a National Statistics Ministry report:

देशातील लोक अन्नावर कमी आणि कपडे, मनोरंजन आणि इतर गोष्टींवर जास्त पैसा खर्च करत आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय कुटुंबांचा घरगुती खर्च दुप्पट झाला आहे.

ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. तथापि, सरकारने डेटामधील अनियमिततेचा हवाला देत 2017-18 सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले नाहीत.

आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये शहरी भागात सरासरी मासिक दरडोई उपभोग खर्च (MPCE) 6,459 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 2011-12 मध्ये तो 2,630 रुपये होता.

ग्रामीण भारतातील खर्च 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे. टक्केवारीनुसार भारतीय कुटुंबे अन्नावर कमी खर्च करत आहेत. कपडे, टीव्ही आणि मनोरंजन या माध्यमांवर ते अधिक खर्च करत आहेत. एकूण 2,61,746 घरांच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. त्यापैकी १,५५,०१४ घरे खेड्यांमध्ये तर १,०६,७३२ घरे शहरी भागात आहेत.

खेड्यांमध्ये जेवणावर दरडोई मासिक खर्च 1,750 रुपये आणि शहरांमध्ये 2,530 रुपये आहे. खेड्यांमध्ये दूध आणि त्याच्या उत्पादनांवर प्रति व्यक्ती सरासरी मासिक खर्च 314 रुपये आणि धान्यावर 185 रुपये होतो.

शहरांमध्ये यावर 466 रुपये आणि 235 रुपये खर्च झाला, मात्र पेये आणि प्रक्रिया केलेल्या वस्तूंवरचा खर्च यापेक्षाही अधिक आहे. यावरील सरासरी मासिक दरडोई खर्च खेड्यांमध्ये 363 रुपये आणि शहरांमध्ये 687 रुपये आहे.

खेड्यांमध्ये मासिक वापरातील अन्नाचा वाटा 46.4 टक्क्यांवर घसरला आहे. 2011-12 मध्ये तो 53 टक्के होता. गैर-अन्न वापर 47 टक्क्यांवरून 53.6 टक्के झाला. शहरी भागातील अन्नाचा वाटा ४२.६ टक्क्यांवरून ३९.२ टक्क्यांवर घसरला आहे.

शहरांमध्ये खाद्येतर वस्तूंवर दरडोई मासिक खर्च 3,929 रुपये होता.

गैर-खाद्य वस्तूंव्यतिरिक्त, खेड्यांमध्ये सर्वाधिक खर्च प्रवासावर 285 रुपये आणि वैद्यकीय खर्चावर 269 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT