Medical Public Education : वैद्यकीय लोकशिक्षणाची गरज : डॉ श्वेता खांडेपारकर

Medical Public Education : डोळ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाविषयी जनसामान्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसंच निरंतर जागृती हवी, मी सवडीने पेशंटना सोप्या भाषेत रुग्णांना समजावून सांगते. सातत्यानं हे मार्गदर्शन हवं, नाही तर त्यांना विसर पडतो असं डॉ श्र्वेता यांनी सांगितलं.
Dr Shweta Khandeparkar
Dr Shweta KhandeparkarDainik Gomantak
Published on
Updated on

आकाशवाणीत सेवेत असताना एकदा एक ओळखीच्या उच्चपदस्थ बाई भेटायल्या आल्या. त्यांनी काही अनुवादाचं काम पाठवलं होतं. आल्या आल्या त्या म्हणाल्या – वाचा तुम्ही. माझे डोळे जरा चुरचुरतात, त्यांनी म्हटलं. डोळे लाल झाले होते.

मी म्हटलं, डोळे आले असावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा. नाही हो. मी कॉण्टॅक्ट लेन्स वापरते. त्याचाच थोडासा प्रोब्लेम झाला. मॅडम अनुवाद घेऊन गेल्या.

निष्णात नेत्रविकारतज्ञ व सर्जन डॉ. श्वेता खांडेपारकर यांना मी यासंदर्भात प्रश्न विचारला. कॉण्टॅक्ट लेन्सचे फायदे काय आणि दुष्परिणाम काय असं विचारलं. ज्यांना चष्मा लावायला नको, वा त्याचा त्रास होतो यावर कॉण्टॅक्ट लेन्स वापरणं हा उपाय आहे. बहुधा खेळाडू, फॅशन आर्टिस्ट, कलाकार यांना याचा जास्त फायदा होतो असं त्यांनी सांगितलं.

तसंच ज्यांचे चष्म्याचे नंबर जास्त असतात त्यांनाही कॉण्टॅक्ट लॅन्सचा लाभ होतो. डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली जर कॉण्टॅक्ट लॅन्स बसवली आणि नंतर काय करावं व काय टाळावं याकडे लक्ष दिल्यास त्याचे दुष्परीणाम होणार नाही असं डॉ खांडेपारकर म्हणाल्या.

कॉण्टॅक्ट लॅन्स लावून झोपू नये, आंघोळ करू नये तसंच ती कितपत वापरावी यालाही मर्यादा असते, म्हणून या सर्व गोष्टींचं पालन करूनच ती वापरावी असंही त्या म्हणाल्या.

हल्ली लहान मुलं, युवक, आम्ही सर्वच जण स्मार्टफोनचा, पीसी संगणकाचा वा लॅपटॉप वा टॅबचा खूपच वापर करतो. या वापराचा परीणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो का? असं मी डॉक्टरना विचारलं. आतांच्या डिजिटल काळांत सगळ्यांनाच स्क्रीनचा वापर करावा लागतो हे त्यांनी मान्य केलं. याचा परिणाम होणारच.

कारण स्क्रीनटाइम जास्त झाला तर डोळे चुरचुरणे, पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे ’ड्राय’ होणे असे प्रकार घडतात. खूपच जास्त मर्यादेबाहेर स्क्रीन वापरली तर डोकेदुखी, मानदुखी, चक्कर येणे, एक वस्तू दोन असल्यासारखं भासणं, डोळ्यांसमोर अंधार येणं, अशीही लक्षणं दिसू शकतात. चष्मा वापरणाऱ्यांचा नंबर वाढतो.

ज्यांना आजपर्यंत चष्मा लागलेला नाही, त्यांना डोळ्यांच्या तपासणीनंतर तो लागतो, असं दिसून आल्याची माहिती डॉ श्र्वेता यांनी दिली. म्हणून सगळ्यांनी स्क्रीन वापराच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली.

डोळ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाविषयी जनसामान्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसंच निरंतर जागृती हवी, मी सवडीने पेशंटना सोप्या भाषेत रुग्णांना समजावून सांगते. सातत्यानं हे मार्गदर्शन हवं, नाही तर त्यांना विसर पडतो असं डॉ श्वेता यांनी सांगितलं.

त्यांच्या टेबलावर गुलझारचे कविता संग्रह होते. आणखीही साहित्यीक पुस्तकं होती. त्यांनी गुलझारच्या कवितांवर चर्चा केली. अनुवादावर मला प्रश्न विचारले.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की नियंत्रणांत नसलेला रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही विकार दृश्टीवर परिणाम करतात. रक्तदाब अति झाल्यास डोळ्यांची नस फुटून वा ब्लॉक होऊन रक्तस्राव होतो.

डायबिटीसवर नियंत्रण आणलं नाही तर परत परत चष्म्याचा नंबर बदलू शकतो. डोळ्यांना इनफॅक्शन सहजपणे होण्याची शक्यता असते. मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. असे प्रकार घडले तर रुग्णाला दिसायला त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे रक्तदाब आणि मधुमेह याविषयी दक्ष राहून वेळोवेळ तपासणी करून घेणं आणि आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं असे प्रतिपादन डॉ श्वेता यांनी केले.

मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया डॉ श्र्वेता करतातच. सकाळी शस्त्रक्रिया व दिवसभर क्लिनिक असं त्यांचं दैनंदिन जीवन. कुठल्या वयात कॅटरॅक्ट होण्याची शक्यता जास्त असते व शस्त्रक्रियेनंतर दृष्टी १०० टक्के येऊ शकते का असं मी विचारलं.मोतीबिंदू तसा लहान मुलांना वा वयस्कर कुणालाही होऊ शकतो.

Dr Shweta Khandeparkar
Bicholim News : नानोडा-दोडामार्ग रस्त्यालगत कचऱ्याच्या राशी; लाटंबार्से गाव अस्वच्छतेच्या विळख्यात

कारणं वेगवेगळीं असतात. प्रामुख्याने जो दिसतो तो सिनायल कॅटरॅक्ट पन्नाशीनंतर होतो. लक्षणं म्हणजे दृष्टी धूसर होणं, डोळ्यातून पाणी वाहणं, डोळ्यांसमोर प्रकाशझोत मारल्यास अंधार येणं, कधीकधी दुप्पट दिसणं, वा इंद्रधनुषी रंग दिसणं असंही होतं. मोतीबिंदू सोडून इतर कसलाही आजार नसल्यास शस्त्रक्रियेनंतर दृष्टी पूर्णपणे बरी होते असं डॉक्टर म्हणाल्या.

डोळ्यांची तपासणी आणि उपचार यासाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. अगोदर ज्या रोगांचं निदान होत नव्हतं ते आता लवकर सिध्द होतं. पूर्वी ज्या विकारासाठी शस्त्रक्रिया शक्य नव्हती ती आतां सोपेपणी करणं शक्य झालंय.

तंत्रज्ञानामुळं शस्त्रक्रियेनंतर जे निर्बंध असायचे ते सुध्दा आता कमी झाले आहेत आणि अल्प काळानंतर पेशंटला दैनंदिन काम करायला मुभा मिळते. परंतु हे सगळं करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्रत्येक पाऊल गरजेचं असतं असं डॉ श्र्वेता यांनी सांगितलं.

ग्लुकोमा म्हणजे काय असं विचारल्यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. डोळ्यांचा प्रेशर वाढून ऑप्टिक नर्वला इजा होणे म्हणजे ग्लुकोमा. यात ओपन आनी क्लोज्ड अशे दोन प्रकार असतात. क्लोज्ड प्रकारांत डोळे लाल होणे, दुखणे आणि दृष्टी कमी होणे ही लक्षणे दिसतात, तर ओपन प्रकारांत विशेष लक्षणे दिसत नाहीत. रूग्ण नेहमीप्रमाणे उपचारासाठी येतो आणि डॉक्टर त्याचं रोगनिदान करतात.

डॉक्टरांनी नेत्रविकारांची माहिती देताना सांगितलं की साथीवेळी डोळे येतात तेव्हा डोळे थंड दिसायला पाण्याची घडी ठेवल्यास बरं वाटतं. पण दूध, तेल वा कोथंबिरीचं पाणी डोळ्यांत घालणं ठीक नव्हे. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

डोळ्यांच्या विकारांची डॉ श्वेता यांनी बहुमुल्य माहिती दिली. डोळ्यांविषयी कोकणी म्हणी व वाक्प्रचार यासंदर्भातही त्यांच्याकडे चर्चा केली. दोळे लागप (नजर लागणे), दोळे वरशे करप (अचेतन होणं), दोळे भरून पळोवप (बारकाईने न्याहाळून पाहणे) व इतर अनेक वाक्प्रचार तसंच म्हणी कोंकणीत आहेत.

Dr Shweta Khandeparkar
Goa Crime News: प्रणव फडते प्राणघातक हल्ला प्रकरण! दोघे अटकेत; म्हापसा पोलिसांची कारवाई

डोळ्यांचा तिरळेपणा शस्त्रक्रियेद्वारा जाऊन पूर्णपणे नीट दृष्टी मिळू शकते काय असा प्रश्न मी केला. तिरळेपणा अनेक प्रकारचा असतो म्हणून अगोदर त्याचं निदान करून नंतर उपचार सुरू करावे लागतात.

लहान वयात शस्त्रक्रिया केल्यास यशस्वी होते. नॉर्मल डोळे असलेल्यांनाही अकस्मात तिरळेपणा आला तर नर्व आणि मेंदूची तपासणी करावी लागते असं त्यांनी सांगितलं.

डोळ्यांची तपासणी आणि उपचार यासाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. अगोदर ज्या रोगांचं निदान होत नव्हतं ते आता लवकर सिध्द होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com