अजब तालिबानचा गजब कायदा; महिलांच्या विमान प्रवासावर बंदी

महिलांना पुरुष नातेवाईकांशिवाय फ्लाईट बोर्डिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
Taliban rule for women Ban on women's air travel
Taliban rule for women Ban on women's air travelDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची अजून एक सणसणीत बातमी समोर आली आहे. महिलांना पुरुष नातेवाईकांशिवाय फ्लाईट बोर्डिंगवर बंदी घालण्यात आली आहे. एअरलाईन्सच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने सर्व एअरलाईन्सना आदेश दिले आहेत की पुरुष नातेवाईकांशिवाय महिलांना विमानात बसू देऊ नये. आता महिलांना पुरुष नातेवाईकासोबतच विमानात बसण्याची परवानगी असेल.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कट्टरपंथी तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील (Afghanistan Women) निर्बंध कडक केले जात आहेत. बुधवारी, प्रथमच मुलींची शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, परंतु काही तासांनंतर, महिलांवर नवीन बंधने लादून सर्व मुलींसाठी शाळा बंद केल्या. (Strange Taliban rule for women Ban on women's air travel)

Taliban rule for women Ban on women's air travel
निवृत्तीनंतरचे आयुष्य जगा निवांत; LICच्या 'या' पोलिसीतून मिळवा पेन्शन

अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाईन दोन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, तालिबानने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना विमानात बसू न देण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की तालिबान, दोन विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विमानतळ इमिग्रेशन अधिकारी यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

एकट्या महिला प्रवाशांना तिकीट देणेही आता बंद केले आहे. फ्लाईटमधील एका प्रवाशाने सांगितले की, पुरुष नातेवाईकांशिवाय प्रवास करणाऱ्या काही महिलांना शुक्रवारी काबूल ते इस्लामाबादला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसण्याची परवानगी नव्हती. दुसर्‍या सूत्राने सांगितले की, यूएस पासपोर्ट असलेल्या अफगाण महिलेला शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.

तालिबानने महिलांना शहरात एकट्याने प्रवास करण्यास बंदी घातली होती, परंतु आतापर्यंत हवाई प्रवासावर असे कोणतेही बंधन नव्हते. 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानात सत्तेवर असताना तालिबानने महिलांवर अत्याचार केले होते, परंतु आता ते महिलांबाबत मवाळपणा दाखवत असल्याचे दिसून आले आहे. पण ऑगस्ट महिन्यापासून तालिबानने अफगाण महिलांना गेल्या दोन दशकांपासून उपभोगलेले सर्व अधिकार हिरावून घेतले आहेत. महिलांना बहुतेक सरकारी नोकऱ्या आणि शालेय शिक्षणातून बाहेर फेकण्यात आले आहे, तसेच कुराणच्या कठोर अर्थानुसार कपडे घालण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com