NCRB ची धक्कादायक आकडेवारी; कोठडीत महिला ठरताहेत पोलीस, तुरुंग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिकार

Women in custody: या घटनांसाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोप महिला हक्क कार्यकर्त्यांनी केला आहे.
Statistics of NCRB
Statistics of NCRBDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking statistics of NCRB; Women in custody are victims of police, prisons and health workers:

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक दावे करते, मात्र तरीही गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यात काहीच यश आलेले नाही.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. 2017 ते 2022 या कालावधीत कोठडीत असलेल्या महिलांवरील बलात्काराची 270 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, असे आकडेवारी दर्शवते.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गुन्हेगारांमध्ये पोलीस कर्मचारी, लोकसेवक, सशस्त्र दलाचे सदस्य, तसेच तुरुंग, सुधारगृहे, बंदीगृहे आणि रुग्णालये यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या घटनांसाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोप महिला हक्क कार्यकर्त्यांनी केला आहे.

Statistics of NCRB
Viral Video: 'कायदे मैं चलो'! पार्किंग कर्मचाऱ्याची IPS वर दादागिरी, जादा शुल्क आकारणाऱ्याला अधिकाऱ्याचा हिसका

आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 89 प्रकरणे नोंदवली गेली होती, जी 2018 मध्ये 60 वर आली. तर, 2019 मध्ये 47, 2020 मध्ये 29, 2021 मध्ये 26 आणि 2022 मध्ये 24 प्रकरणे नोंदवली गेली.

गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणांमध्ये हळूहळू घट झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Statistics of NCRB
दीड वर्षाच्या चिमुरडी, कुत्र्यांनी टोळी आणि डिजे... कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप मुलीचा करुण अंत

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२) अंतर्गत कोठडीतील बलात्काराचे गुन्हे नोंदवले जातात. कोठडीत महिलांसोबत सर्वात जास्त गैरवर्तन झाल्याचे प्रकार उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहेत. 2017 ते 2022 या कालावधीत येथे 92 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर राहिला. येथे 43 गुन्हे दाखल झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com