Omicron Dainik Gomantak
देश

Omicron: SII चा जगाला संदेश! भारत तुमच्यासाठी सदैव उभा आहे

आमच्या कॅम्पसमध्ये लाखोंचा साठा आहे. आमच्याकडे भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 200 दशलक्षपेक्षा जास्त डोस आरक्षित आहेत. म्हणून, जर सरकार बूस्टर डोसची घोषणा करणार असेल, तर त्याचा आमच्याकडे खुप साठा आहे.

दैनिक गोमन्तक

नवीन कोविड स्ट्रेन 'ओमिक्रॉन' (Omicron) जगभरात धोक्याची घंटा वाढवत असताना, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) प्रमुख अदार पूनावाला, जे कोविड-19 लस Covishield बनवते, ते म्हणाले की Omicron-विशिष्ट बूस्टर शॉट्स शक्य आहेत.

लॅन्सेटने नोंदवले आहे की Covishield ची परिणामकारकता खूप जास्त आहे आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आणि मृत्यूची शक्यता लक्षणीयरीत्या कमी आहे. Omicron साठी चाचण्या सुरू आहेत आणि आम्हांला दोन आठवड्यांत निकाल मिळायला हवा.

ऑक्सफर्डमधील (University of Oxford) शास्त्रज्ञांनी देखील त्याचे संशोधन सुरू ठेवले आहे, त्याच्या निष्कर्षावरती आम्ही एक नवीन लस शोधून काढू शकतो जी आतापासून 6 महिन्यांपर्यत बूस्टर म्हणून काम करेल. Covishield ची परिणामकारकता कालांतराने कमी होईल हे आवश्यक नाही.

सर्वांना प्राधान्य देत प्रत्येकाला लसीचे 2 डोस मिळावेत. संरक्षित राहण्याची ही पहिली पायरी आहे. त्यानंतरच पुढील वर्षभरात बूस्टरसह ती सुरक्षितता आणखीन वाढवता येईल. प्रत्येकाला लसीकरणाचे 2 डोस मिळावेत या कडे सरकारचे लक्ष राहिले पाहिजे.

आमच्या कॅम्पसमध्ये लाखोंचा साठा आहे. आमच्याकडे भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 200 दशलक्षपेक्षा जास्त डोस आरक्षित आहेत. म्हणून, जर सरकार बूस्टर डोसची घोषणा करणार असेल, तर त्याचा आमच्याकडे खुप साठा आहे.

आमच्याकडे Covovax चाही भरपूर साठा आहे, जी एक नवीन लस आहे आणि काही आठवड्यांतच त्याला परवाना मिळण्याची शक्यता आहे. CoviShield साठी, किंमत बदलणार नाही. ही एक निश्चित किंमत आहे आणि आम्ही ती तशीच ठेवू.

आमचा जगाला संदेश आहे की भारत (India) तुमच्यासाठी सदैव उभा आहे आणि आमच्याकडे जगासाठी आवश्यक असलेल्या लसीच्या डोसपेक्षा जास्त प्रमाणात डोस आहे. आपल्या राष्ट्राला दिलेला टॅग देत म्हटले आहेत की, जगासाठी फार्मसी बनण्यात आपण आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावू शकतो.

उत्पादनाबद्दल आम्ही सध्या महिन्याला लसींचे सुमारे 250 दशलक्ष डोस तयार करत आहोत, त्यामुळे आम्ही 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत चीनच्या 1 अब्ज लसीच्या डोसच्या दाव्याची बरोबरी करू शकतो. सध्या आणि पुढील भविष्यासाठी, भारतीय लस उद्योगाला कच्च्या मालाच्या आयातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

मुलांसाठी CoviShield नाही. लहान मुलांना लस देण्यासाठी आमचा दृष्टीकोन CovoVax सोबत असेल - नवीन लस भारतात परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि ती लवकरच केली जावी. CovoVax पुढील 6 महिन्यांत मुलांसाठी उपलब्ध होईल. आमचा दृष्टीकोन म्हणजे 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना CovoVax ने लसीकरण करणे हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT