माकड पकडतयं पाणी; पाहा Video

सोशल मीडिया (Social media) हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Monkeys
MonkeysDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडिया (Social media) हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचे व्हिडिओ देखील समाविष्ट असतात, जे खूप मजेदार आणि लोकांचे मनोरंजन करणारे असतात. आजकाल माकडांचे (Monkeys) व्हिडिओ मोठ्याप्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही माकडे पाहिली असतीलच. विशेषतः माकडांची पिल्ल, जी दिवसभर मस्ती करत असतात. ते दिसायला खूप दिसतात, परंतु कधी कधी त्यांच्या मस्तीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र आता सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहूनच तुम्ही याचा अंदाज लावू शकता.

वास्तविक, सोशल मीडियावर एका छोट्या माकडाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो यूजर्सच्या चांगलाच पंसतीस पडला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड हाताने पाणी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वॉश बेसिनच्या नळाजवळ एक लहान आणि गोंडस माकड बसले आहे, ज्यातून पाणी पडत आहे. दरम्यान माकड आपल्या दोन्ही हातांनी ते पडणारे पाणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काय माहीती आहे की, आजपर्यंत कोणीही पाणी पकडू शकले नाही. मग ते छोटेसे माकड कसे पकडू शकले.

Monkeys
पेन्सिलचा वाद मिटवण्यासाठी शाळकरी मुलांनी गाठले पोलीस स्टेशन; केली गुन्हा नोंद करण्याची मागणी

दरम्यान, माकडाचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. यावर लोक आपल्या मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तो पाणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे'. त्याचवेळी आणखी एका यूजर्सने लिहिले आहे की, 'त्याचा गोंधळलेला क्यूट लूक पाहून आम्हाला खूप मज्जा येत आहे'.

तसेच, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर monkeyanduniverse या नावाने शेअर करण्यात आला आहे. हा छोटा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरुन लावता येतो की, या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 75 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. माकडांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकीत होऊ शकतो. तसेच पोट धरुन हसूही शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com