Nitin Gadkari Dainik Gomantak
देश

Nitin Gadkari: दरीत कोसळण्यापूर्वीच लागणार गाडीचे ब्रेक; गडकरींनी आणला नवा फॉर्म्युला

Nitin Gadkari: यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर पडण्याऐवजी मागे येतो.

Ashutosh Masgaunde

Nitin Gadkari On Road Accidents in Rajya Sabha: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ट्रक आणि वाहनांना महामार्गावरील अपघातांपासून वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याचे सांगितले.

खरे तर, राज्यसभेत नामनिर्देशित खासदार गुलाम अली (Gulam Ali) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा वापर अवघड क्षेत्रात करण्याचा विचार करत आहे.

नामनिर्देशित खासदार अली यांनी प्रश्न विचारला की, सध्याचे सरकार काश्मीरमध्ये खूप काम करत आहे, मात्र महामार्गावर ट्रकचे अपघात वाढत आहेत.

ते म्हणाले की, आपघातातील वाहन किंवा ट्रक इतका मोठा असतो की तो एकदा घसरला आणि दरीत खाली पडला की मग हायड्रो प्रकल्पामुळे ट्रक किंवा मृतदेह सापडतच नाही.

ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) डोड्डा ते किश्तवाड आणि उधमपूर ते श्रीनगर या मार्गावर अपघाती क्रॅश बॅरिअर्स बसवण्याची विनंती मी मंत्र्यांना करेन, त्यामुळे अपघात थोडे कमी होऊ शकतील.

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, डोंगराळ भागात अपघात होतात हे खरे आहे. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये फिक्स केले जाते.

यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर पडण्याऐवजी मागे येतो. त्यांनी या उपकरणाची किंमत थोडी जास्त असल्याचे सांगितले.

गडकरी म्हणाले की, उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात. असे प्रयोग आम्ही काही ठिकाणी केल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्याचा वापर करून असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करू.

आता बांबू क्रॅश बॅरियर्स करण्यात आल्याचेही गडकरींनी सांगितले. आसाममधून येणारे बांबूचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT