छेडाछेडीला विरोध केल्याने तरुणीला सॅनिटायझर पाजत काढला व्हिडिओ

27 जुलै रोजी इयत्ता 11वीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना आरोपीने तिला अडवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावर तिला जबरदस्ती सॅनिटायझर.
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Girl Forced To Drink Sanitizer In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विनयभंगाला विरोध केल्याने १६ वर्षीय तरुणीला काही तरुणांनी सॅनिटायझर पाजले. त्यामुळे तिला जीव गमवावा लागला.

असा आरोप आहे की 27 जुलै रोजी इयत्ता 11वीची विद्यार्थिनी कॉलेजहून घरी परतत असताना उदेश राठोड या आरोपीने तिला अडवले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उदेशसोबत आणखी तीन तरुण उपस्थित होते. विद्यार्थिनीने विनयभंगाचा विरोध केल्यावर तिला सॅनिटायझर पिण्यास भाग पाडले. पीडितेच्या भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.

Uttar Pradesh Crime
Nuh Violence: 'मी कारगिल युद्ध लढलो अन् माझा मुलगा...', नूह हिंसाचाराचा बळी ठरलेल्या नीरजच्या वडिलांची वेदना

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी त्याचा व्हिडीओही बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. सॅनिटायझर प्यायल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Uttar Pradesh Crime
Train Shootout: "हे पाहून मला कसाब आठवला" जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबारातील प्रत्यक्षदर्शी म्हणाला...

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत आरोपींना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले. प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com