अखेरीस एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवण्यात आली, यासह एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. DIPAM सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की, एअर इंडियामधील सरकारचा संपूर्ण हिस्सा टाटा सन्सच्या उपकंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरित करण्यात आला आहे. आतापासून एअर इंडियाचे नवीन मालक टाटा समूह असणार (Air India Handover To TATA Group) आहेत. यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
एअर इंडियाच्या (Air India) पुनरागमनामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आता ही विमानसेवा जागतिक दर्जाची बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय इतरही अनेक बदलांचा विचार केला जात आहे. यामध्ये बसण्याची व्यवस्था तसेच केबिन क्रूचा ड्रेस कोड बदलणे समाविष्ट आहे. टाटा समूहाचा व्यवसाय हॉटेल उद्योगातही आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाच्या प्रवाशांनाही चांगल्या दर्जाचे जेवण मिळणार आहे.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता एअर इंडियाच्या सर्व फ्लाइटमध्ये रतन टाटा यांचा व्हॉईस रेकॉर्ड वाजवला जाईल. ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा समूहाने 18000 कोटी रुपयांना एअर इंडियामधील 100 टक्के हिस्सा खरेदी केला होता. टाटा सन्सची उपकंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडने ही बोली लावली होती.
एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे एक संघ टाटा समूहाला एअर इंडियाच्या ऑपरेशनसाठी कर्ज देईल. कन्सोर्टियममध्ये SBI, PNB, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असणार आहे. हे कंसोर्टियम टाटा समूहाला मुदत कर्ज तसेच खेळते भांडवल कर्ज प्रदान करेल. टाटा समूहाच्या उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने 8 ऑक्टोबर 2021 रोजी एअर इंडियाला 18000 कोटींना विकत घेतले होते.
टाटा समूहाद्वारे एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वी, सरकारने राष्ट्रीय विमान कंपनी आणि विशेष उद्देश संस्था 'AIAHL' यांच्यात नॉन-कोअर मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी करार अधिसूचित केला आहे. टाटा समूह 2700 कोटी रुपयांची रोख परतफेड करेल आणि एअरलाइनचे 15,300 कोटी रुपयांचे कर्ज घेईल. या करारात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि त्याची शाखा एआयएसएटीएसच्या विक्रीचाही समावेश आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) 24 जानेवारी रोजी एअर इंडिया लिमिटेड आणि AI अॅसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) द्वारे एअरलाइन मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी केलेल्या कराराच्या फ्रेमवर्कला सूचित केले होते. AIAHL ची स्थापना सरकारने 2019 मध्ये एअर इंडिया समूहाची कर्ज आणि नॉन-कोअर मालमत्ता ठेवण्यासाठी केली होती.
एअर इंडियाच्या चार उपकंपन्या - एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि., एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लि., एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तसेच नॉन-कोअर मालमत्ता इ. विशेष उद्देश युनिट (AIAHL) कडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.