Punjab Assembly Election साठी भाजपची दुसरी यादी जाहीर

पंजाबमध्ये होणाऱ्या 117 जागांसाठी विधानसभा निवडणुकीत भाजप हा 65 जागांवर निवडणूक लढवणार आहे,या निवडणूकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या लोक काँग्रेस पार्टी आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या संयुक्त अकाली दल-धिंडसा या पक्षा सोबत युती केली आहे
Punjab Election Bjp
Punjab Election BjpDainik Gomantak

विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) भाजपने 27 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने बटाला येथून फतेह सिंग बाजवा तर फगवाडामधून विजय सांपला यांना उमेदवारी दिली आहे. पंजाबमध्ये यावेळी भाजप (Bjp) ने या विधानसभा निवडणूकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या लोक काँग्रेस पार्टी आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या संयुक्त अकाली दल-धिंडसा या पक्षा सोबत युती केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) हे आधी कॉंग्रेस पक्षाचे होते व ते पंजाब चे मुख्यमंत्री सुध्दा होते. नंतर चरणजीत सिंग चन्नी हे पंजाब चे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी दिली.

Punjab Election Bjp
Covishield अन् Covaxin लस मार्केटमध्ये होणार उपलब्ध, DCGI ने दिली मंजूरी

बीजेपी चे राष्ट्रीय महासचिव व पंजाब प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले की, बीजेपी ने या आधी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली तर आता 27 उमेदवारांची यादी खालील प्रमाणे जाहीर केली आहे.

म.संघ उमेद्वाराचे नाव

1 भोआ सीमा कुमारी

2 गुरदासपुर परमिंदर सिंह गिल

3 बटाला फतेह सिंह बाजवा

4 डेरा बाबा नानक कुलदीप सिंह कहलाओ

5 मजीठा प्रदीप सिंह भुल्‍लर

6 अमृतसर पश्चिमकुमार अमित वाल्मिकी

7 अटारी बलविंदर कौर

8 फगवाड़ा विजय सांपला

9 शाहकोट नरिंदर पाल सिंह चंडी

10 करतारपुर सुरिंदर महे

11 जालंधर कैटसरबजीत सिंह मक्‍कड़

12 आनंदपुर साहिबपरमिंदर शर्मा

13 रूपनगर इकबाल सिंह लालपुरा

14 चमकौर साहिब दर्शन सिंह शिवजोत

15 एसएएस नगरसंजीव वशिष्‍ठ

16 समराला रंजीत सिंह गहलेवाल

17 लुधियाना उत्‍तरप्रवीण बसंल

18 मोगा डॉ. हरजोत कमल मोगा

19 गुरु हर सहाय गुरपरवेज सिंह संधू

20 बलुआना वंदना सागवान

21 लांबी राकेश ढींगरा

22 मौर याल सिंह सोढ़ी

23 बरनाला धीरज कुमार

24 धुरी रनदीप सिंह देओल

25 नाभा गुरप्रीत सिंह शाहपुर

26 राजपुरा जगदीश कुमार जग्‍गा

27 घनौर विकास शर्मा

पंजाबमध्ये होणाऱ्या 117 जागांसाठी विधानसभा निवडणुकीत भाजप हा 65 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा37 तर सुखदेव सिंह धिंडसा यांचा युनायटेड अकाली दल-धिंडसा 15 जागांवर निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीची तारीख बदलून 20 फेब्रुवारी केली आहे. पंजाबमध्ये 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com