Covishield अन् Covaxin लस मार्केटमध्ये होणार उपलब्ध, DCGI ने दिली मंजूरी

करोना महामारीविरुध्दच्या (Corona Epidemic) लढाईत लस निर्णायक भूमिका बजावत आहे. त्यामुळे सरकारने सशर्त बाजारात दोन लसींना विकण्याची परवानगी दिली आहे.
Covishield  & Covaxin
Covishield & CovaxinDainik Gomantak

करोना महामारीविरुध्दच्या लढाईत लस निर्णायक भूमिका बजावत आहे. त्यामुळे सरकारने सशर्त बाजारात दोन लसींना विकण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान आता Covishield आणि Covaxin लसींना अटींसह बाजारात विकता येणार आहे. DCGI ने ही यासाठी मान्यता दिली आहे. (DCGI Has Approved The Sale Of Covishield And Covaxin Vaccines In The Market With Conditions)

Covishield  & Covaxin
देशात कोरोना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण झाले कमी

दरम्यान, विहित परिस्थितीत या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खाजगी रुग्णालये आणि दवाखाने लस खरेदी करु शकतील. आपत्कालीन वापराबाबतचा सुरक्षिततेचा डेटा DCGI ला 15 दिवसांच्या आत द्यावा लागतो. त्यामुळे आता सशर्त बाजार मंजुरीमध्ये 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा रेग्युलेटरकडे सादर करावा लागेल. तसेच, ही माहिती को-विनवर देखील द्यावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com