New oil reserves found in the country Dainik Gomantak
देश

Crude Oil India: देशात सापडले तेलाचे नवे साठे, सहा महिने रोज होणार 45 हजार बॅरल उत्पादन

Ashutosh Masgaunde

New oil reserves found in the country, production of 45 thousand barrels per day for six months:

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी देशात नवीन तेल साठे सापडल्याची घोषणा केली आहे.

"काकीनाडा किनार्‍यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात नुकतेच पहिल्यांदा तेल काढण्यात आले. त्यावर 2016-17 मध्ये काम सुरू झाले होते, तथापि, कोविडमुळे याला थोडा विलंब झाला," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

तेथील 26 विहिरींपैकी 4 विहिरी आधीच कार्यरत आहेत. ते म्हणाले, “मे आणि जूनपर्यंत, आम्ही दररोज 45,000 बॅरल उत्पादन करू शकू अशी अपेक्षा आहे. हे उत्पादन आपल्या देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या ७ टक्के आणि वायू उत्पादनाच्या ७ टक्के असेल."

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ONGC ने बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोल-जल ब्लॉक 98/2 पासून 'पहिले तेल' उत्पादन सुरू केले आहे. ज्या ठिकाणी तेल काढले जाते ते ठिकाण कृष्णा गोदावरी खोऱ्यातील काकीनाडाच्या किनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.

बेसिनमधून तेल आणि वायू उत्पादनासाठीचा टप्पा 3, आधीच सुरू आहे आणि जून 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 98/2 प्रकल्पामुळे ONGC च्या एकूण तेल आणि वायू उत्पादनात अनुक्रमे 11 टक्के आणि 15 टक्के वाढ अपेक्षित आहे.

जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक असलेला भारत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील विविध स्त्रोतांकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे.

"कंपनीने पहिल्या FPSO साठी कृष्णा गोदावरी खोल-पाणी ब्लॉक 98/2 (बंगालच्या उपसागरात) 7 जानेवारी 2024 रोजी तेलाचे उत्पादन सुरू केले, जे प्रकल्पाचा टप्पा-2 पूर्ण झाल्याचे दाखवते," असे ONGC ने म्हटले आहे.

तेल आणि वायू उत्पादनासाठी फेज-3 आधीच सुरू आहे आणि जून 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. 98/2 प्रकल्प ONGC च्या एकूण तेल आणि वायू उत्पादनात अनुक्रमे 11 टक्के आणि 15 टक्क्यांनी वाढ करेल. होण्याची शक्यता आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT