गोव्यातील IPSHEM च्या अपग्रेडेशनसाठी ONGC खर्च करणार 250 कोटी रूपये...

गोव्यात फेब्रुवारीत होणाऱ्या इंडिया एनर्जी वीकचे यजमानपद या संस्थेकडे आहे.
Goa ONGC IPSHEM
Goa ONGC IPSHEMDainik Gomantak
Published on
Updated on

Goa ONGC IPSHEM: गोव्यातील ONGC ची इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम सेफ्टी, हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट (IPSHEM) या संस्थेच्या अपग्रेडेशनसाठी ONGC कडून 250 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

दरम्यान, हीच संस्था पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये गोव्यात होणाऱ्या भारत ऊर्जा सप्ताह 2024 च्या दुसऱ्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहे.

यात जागतिक ऊर्जा मागणीच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करण्यासाठी 100 हून अधिक देशांतील 35,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.

सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) गोव्यातील बेतूल येथे असलेल्या पेट्रोलियम सेफ्टी, हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट (IPSHEM) च्या इन्स्टिट्यूटचे अपग्रेडेशन करण्यासाठी ₹ 250 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

ज्यामध्ये पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी मॉक ऑइल रिगचा समावेश असेल.

Goa ONGC IPSHEM
Julio Ribeiro: पंतप्रधान मोदींचा ख्रिसमस संदेश केवळ ख्रिश्चन मतांसाठी...

IPSHEM चे कार्यकारी संचालक आणि प्रमुख संजीव सिंघल यांच्या माहितीनुसार सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटर, हेलिकॉप्टर अंडरवॉटर एस्केप ट्रेनिंग, ऑफशोअर प्लॅटफॉर्म सुरक्षा प्रशिक्षण यासारख्या सुविधा निर्माण करत आहोत.

आमच्या लोकांसाठी ऑपरेशनल ट्रेनिंगसाठी एक ड्रिलिंग रिग आणण्याची आमची योजना आहे. एक ऑनशोअर प्रोसेस प्लांट्स सेफ्टी ट्रेनिंग कॉम्प्लेक्स आणि त्यानंतर आम्ही एक प्रशिक्षण केंद्र तयार करणार आहोत. जे जागतिक दर्जाचे असेल.

जेणेकरुन आम्ही परदेशी प्रशिक्षणार्थी आणू. यासाठी आम्ही 250 कोटी रूपये खर्च करणार आहोत.

इंडिया एनर्जी वीकची संधी साधून या संस्थेला एका अनोख्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थेत रूपांतरित केले आहे. ऑनशोअर किंवा ऑफशोअर उपक्रमांतून हायड्रोकार्बन क्षेत्राशी संबंधित सर्व कर्मचार्‍यांसाठी सर्व प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा येथे पुरविल्या जातील.

Goa ONGC IPSHEM
Goa ITI: गोव्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थींना टाटा ग्रुपचे 'इंडियन हॉटेल्स' शिकवणार आदरातिथ्य कौशल्य

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघ (FIPI) द्वारे आयोजित, भारत ऊर्जा सप्ताह 2024 बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या इंडिया एनर्जी वीकमधील अनेक कार्यक्रम पुढे घेऊन जाईल.

अर्थपूर्ण चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योग तज्ज्ञ, धोरण निर्माते, शैक्षणिक आणि उद्योजक यांच्यातील सहयोगासाठी उत्प्रेरक म्हणून हा इव्हेंट काम करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com