सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांना अक्षरशः धक्का बसला आहे. हरियाणातील तब्बल ८० वर्षांचे आजोबा १५,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करताना दिसतात. या वयात बहुतेक लोक आरामाची वाट धरतात, मात्र या धाडसी आजोबांनी आकाशात मुक्तपणे उडत एक वेगळाच इतिहास घडवला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट सतत हास्य आणि आत्मविश्वास दिसून आला.
व्हिडिओच्या सुरुवातीला विमानाच्या आतले दृश्य दाखवले आहे. कॅमेरा सुरू आहे, वाऱ्याचा आवाज घुमत आहे, आणि आजोबा सेफ्टी बेल्ट बांधून शांतपणे बसलेले दिसतात. इतक्यात कोणी तरी त्यांना विनोदाने विचारते, “भीती वाटते का?” त्यावर ते मिश्किल हसत म्हणतात, “आम्ही हरियाणाचे आहोत, आम्हाला कशाचीही भीती नाही.” त्यांच्या या संवादानेच इंटरनेट त्यांचे फॅन झाले असून, कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
काही क्षणांनी विमानाचे दार उघडते आणि खाली दिसणारी १५,००० फूट खोल दरी अंगावर काटा आणते. तरीही आजोबांच्या चेहऱ्यावरील हसू कायमच राहते. जंपच्या क्षणी व्हिडिओ स्लो मोशनमध्ये जातो आणि आजोबा दोन्ही हात पसरून आकाशात झेपावताना दिसतात. या दृश्याने लाखो लोकांना प्रेरणा मिळाली असून, धाडसाची खरी व्याख्या या वयस्कर साहसी व्यक्तीने जगासमोर ठेवली आहे.
हा प्रेरणादायी व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @ankitranabigmouth या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. “आजोबा १५,000 फूट स्कायडायव्हिंग करत आहेत” असे कॅप्शन असलेला हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काही तासांतच व्हायरल झाला. आतापर्यंत 5.8 दशलक्षांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. कमेंटमध्ये लोक आजोबांचे भरभरून कौतुक करताना दिसतात. काहींनी लिहिले, “धैर्याला वयाची अट नसते.”
सोशल मिडियावर या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आजोबांना बिघडवणारा हा पहिलाच नातू आहे,” तर दुसऱ्याने म्हटले, “यांच्या तरुणपणाची कल्पनाच करवत नाही!” अनेकांनी हा व्हिडिओ पाहून प्रेरणा घेतली असून, आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द निर्माण झाल्याचे सांगितले. या आजोबांनी दाखवून दिले की तरुणपण हे वयात नसून मनात असते, आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.