नवी दिल्ली - अहो मोदीजी,(Modi) तुम्ही दोहामधील (Doha)(कतार) तालिबानशी(Taliban) चर्चा करू करता. परंतु दिल्लीच्या सीमेवर दहा महिन्यांपासून असलेल्या अन्नदातांशी का बोलत नाही? असा सवाल काँग्रेस ने मोदी सरकारला केला आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये(karnal) पाण्याच्या तोफांचा मारा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आला. याचा काँग्रेसने जाहीर (Congress) निषेध केला आहे.
देशातील नरेंद्र मोदी(narendra modi) सरकार (Modi Government) तालिबानशी चर्चा करतात परंतु देशातील बळीराजाशी चर्चा का करत नाही? अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे. मोदींनी देशातील शेतकऱ्यांशी बोलून तिन्ही कृषी कायदे रद्द करावे. अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने शेतकरी आंदोलन करीत आहेत.
देशातील शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्यासाठी कट रचले जात आहेत.असे म्हणत जोरदार निशाणा मोठी सरकारवर साधला आहे.हा शेतकऱ्याविषयीचा (Farmers)कट मर्यादित नाही. तर भारतीय जवान आणि शेतकऱ्यांमध्ये आपापसात षड्यंत्र रचले जात आहेत. कर्नालमधील (karnal)आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. तरी परंतु शेतकऱ्यांनी आपला संयम सोडला नाही. असंही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, अहो मोदीजी, तुम्ही दोहामध्ये (कतार) तालिबान्यांशी चर्चा करू शकता. पण दिल्लीच्या(Delhi) सीमेवर दहा महिन्यांपासून आंदोलन कर्त्या अन्नदातांशी का बोलत नाही? हा सत्तेचा अहंकार कशासाठी? असा थेट सवाल त्यांनी मोदी सरकारला केला. शेतकऱ्यांना पिक आणि पुढची पिढी जगवायची आहे. परंतु मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरत आहेत. ही लढाई देश वाचवण्यासाठी आहे. हे मोदी सरकार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे देशाला गुलाम बनवू शकत नाहीत असही सुरजेवाला म्हणाले.
नरेंद्र मोदींनी आपले काम सोडून शेतकऱ्यांची चर्चा करून त्यावर मार्ग काढावेत. मोदींनी स्वतः शेतकऱ्यांशी बोलावे त्यांनी आपल्या कोणत्याही प्रतिनिधीला (representative)पाठवू नये. आणि त्यानंतर तिन्ही कृषी कायदे(Agricultural laws) रद्द करण्याची घोषणा करावी.
मुझफ्फरनगरमध्ये किसान महापंचायत नाही तर ती निवडणूक सभा घेत आहेत असे भाजपने म्हटले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचे आरोप देखील भाजपाने केले आहे. तसेच केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar)किसान महापंचायत आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि त्यालगतच्या राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. त्यावरून देखील भाजपाने निशाणा साधत हल्लाबोल केला. मोदींना 'शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा' असल्याचे देखील म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.