Goa:कॉंग्रेसची नवी रणनीती : चिदंबरम यांची प्रतीक्षा

८० टक्के उमेदवारी नव्या चेहऱ्यांना देण्याचे धोरण
Congress Party Goa
Congress Party Goa Dainik Gomantak

पणजी : भाजपच्या (Goa)आक्रमकतेपुढे टिकून (Bjp) राहण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) आता वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P Chidambaram) यांचा धावा करणे सुरू केले आहे. चिदंबरम पुढील आठवड्यात निवडणूक रणनीती निश्चित करण्यासाठी गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कॉंग्रेसने सध्या उमेदवारीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याआधारे ८० टक्के उमेदवारी नव्या चेहऱ्यांना देण्याचे ठरवले आहे. वेळ्ळी येथे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला विरोध झाला. ते पाहता कॉंग्रेसमध्ये आता प्रवेश‌ करण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना कॉंग्रेस प्रवेश देणार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू काब्राल हे २२ ऑगस्ट रोजी तर ओलांसियो सिमोईश हे २९ रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पणजी व ताळगावात कॉंग्रेसने मोन्सेरात कुटुंबाला धक्का देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या निकटवर्तींयांपैकी दोन मोठे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यांच्या कॉंग्रेस‌ प्रवेशाची तारीखही नंतर जाहीर केली जाणार आहे.

Congress Party Goa
Goa: मुरगाव हिंदू समाजातर्फे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार

माजी मंत्री मिकी पाशेको (Micky Pacheco) यांना प्रवेश देऊन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी संघटनेवरील आपली पकड सिद्ध‌ केली आहे. आता अधूनमधून आंदोलने करून कॉंग्रेसमधील धुगधुगी कायम ठेवण्यास कारण ठरलेल्या युवा नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी ते पुढे‌ सरसावले आहेत. मोले जैव संवेदनशील भागाशी संबंधित तिन्ही प्रकल्प रद्द करणे, पर्यावरण रक्षणासाठी नगरनियोजन कायद्यातील १६ब कलम रद्द करणे अशी आश्वासने देत कॉंग्रेसने लोकांजवळ जाण्याचा प्रयत्न चालवला आहे. फॉर्मेलीनमुक्त मासळी आणि कडक ल़ोकायुक्त अशी आश्वासने कॉंग्रेसने दिली आहेत. भाजपमध्ये कॉंग्रेसच्या (Bjp) १० आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यापैकी थिवी, पणजी, ताळगाव, सांताक्रूझ, सांत आंद्रे, काणकोण, कुंकळ्ळी, केपे मतदारसंघांवर कॉंग्रेसने नजर ठेवली आहे. येथील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नाराज असलेले भाजपचे मूळ कार्यकर्ते तटस्थ राहतील काय? किमान ते या आमदारांना मदत करणार नाहीत? यासाठी कॉंग्रेसने छुपे प्रयत्न सुरू केले आहेत.

Congress Party Goa
Goa: चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com