COVID-19: या 10 देशांमधून भारतात येणाऱ्यांसाठी आरोग्य मंत्रालयाची नवी नियमावली

मंत्रालयाने कोरोना व्हायरसची (COVID-19) वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा नवीन स्ट्रेन (Corona New Strain) लक्षात घेता हे नवीन नियम लादले असल्याचे सांगितले आहे.
COVID-19: New guidelines on international travel to India
COVID-19: New guidelines on international travel to IndiaDainik Gomantak

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India ) अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर काल आणखीन नवीन निर्बंध लादले आहेत. मंत्रालयाने कोरोना व्हायरसची (COVID-19) वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा नवीन स्ट्रेन (Corona New Strain) लक्षात घेता हे नवीन नियम लादले असल्याचे सांगितले आहे. आता 10 देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट (COVID-19 Negative Report) दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे.आधी हा नियम फक्त यूके(UK), युरोप(Europe) आणि मध्य पूर्वसाठी होता. आता या यादीत आणखी सात देशांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे देश आहेत - दक्षिण आफ्रिका (South Africa), बांगलादेश (Bangladesh), बोत्सवाना(Botswana), चीन (China), मॉरिशस, न्यूझीलंड (New Zealand)आणि झिम्बाब्वे.(COVID-19: New guidelines on international travel to India)

COVID-19: New guidelines on international travel to India
कर्नाटकात प्रशासन झाले कडक; आता लस न घेणाऱ्याला मिळणार नाही राशन

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना अद्ययावत मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे. केंद्राने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या नवीन वाढता स्ट्रेन पाहता आणि देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता, आणखी सात देशांचा समावेश अशा देशांच्या यादीत करण्यात आला आहे जिथून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर उतरताना दुसरी RT-PCR चाचणी घ्यावी लागेल. याशिवाय, त्यांना भारतात उड्डाण करण्यापूर्वी आरटी-पीसीआरची पहिली चाचणी देखील करावी लागणार आहे.

यापूर्वी प्रवासाचे मार्गदर्शक तत्त्वे फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आले होते . यानुसार, फक्त ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांना भारतीय विमानतळावर उतरताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार होती. त्याचबरोबरफ केंद्रांने आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.

COVID-19: New guidelines on international travel to India
गोव्यासह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आयोग असमर्थ

दरम्यान वास्तविक, दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा आणखीन एक नवीन स्ट्रेन सापडला आहे, वास्तविक पाहता हा स्ट्रेन अद्यापतरी भारतात सापडलेला नाही. केंद्राने ही कडक पावले फक्त या नवीन स्ट्रेनच्या संसर्गाचा प्रवेश रोखण्यासाठी उचलली आहेत. आरोग्य सचिवांनी पत्रात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या संपूर्ण जीनोम अनुक्रमण (डब्ल्यूजीएस) क्रियाकलाप वाढवण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com