Rahul Gandhi Interviews Satya Pal Malik Dainik Gomantak
देश

Satya Pal Malik: लिहून देतो, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येत नाही! गोव्याच्या माजी राज्यपालांचा दावा

राहुल गांधींनी घेतली मलिक यांची स्फोटक मुलाखत; जातनिहाय जनगणना, ईडी कारवायांवरही भाष्य

Akshay Nirmale

Rahul Gandhi Interviews Satya Pal Malik: मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हवं तर लिहून देतो, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे नेते आणि गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 14 ऑक्टोबर रोजी सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत राहुल गांधींच्या यूट्यूब अकाऊंटवर आज, गुरूवारी स्ट्रीम करण्यात आली आहे.

दरम्यान, मलिक हे 3 नोव्हेंबर 2019 ते 18 ऑगस्ट 2020 या काळात गोव्याचे राज्यपाल होते. त्यापुर्वी ते जम्मू-काश्मिर, बिहार, ओडिशा या राज्यांचेही राज्यपालपद होते. भाजपचे नेते असूनही सत्यपाल मलिक यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

ते बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

दरम्यान, राहुल गांधींना दिलेल्या 28 मिनिटांच्या मुलाखतीत मलिक यांच्यासोबत मणिपूरमधील हिंसाचार, पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन आणि जातनिहाय जनगणना यासह अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले आहे.

मलिक म्हणाले की, निवडणुकीला फक्त 6 महिने उरले आहेत. मी लिहून देतो की, आता मोदी सरकार सत्तेत येणार नाही.

जम्मू काश्मिरविषयी बोलताना ते म्हणाले की, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करता येणार नाही. अमित शाह यांनी राज्याचा दर्जा परत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसे करून लवकरात लवकर तिथे निवडणुका घ्याव्यात. तिथे राजौरी आणि काश्मीर खोऱ्यात दररोज हिंसाचार होत आहे.

पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, हा हल्ला भाजपने केला असे मी म्हणत नाही, पण पक्षाने त्याचा राजकीय वापर केला. पंतप्रधान मोदींनी लोकांना मतदानाला जाताना पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण ठेवा, असे आवाहन केले होते.

हल्ला झाला त्या दिवशी पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी त्यांना अनेकदा फोन केला, पण संपर्क झाला नाही. काही वेळाने जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा बरेच सैनिक शहीद झाल्याचे मी त्यांना सांगितले.

आपल्या चुकीमुळे झाले असेही सांगितले. तेव्हा त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले. यावर काहीही बोलू नको, असेही मला म्हणाले. मला वाटले होते की, या प्रकरणाची चौकशी होईल, पण त्याचे काहीही झालेले नाही.

यावेळी राहुल म्हणाले की, मला हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मी तत्काळ विमानतळावर पोहचलो पण मला एका खोलीत बंद केले गेले होते.

शहीद जवानांनी गृहमंत्रालयाकडे ५ विमानांची मागणी केली होती, मात्र त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांना रस्त्यावरून जाण्यास भाग पाडले गेले आणि हा हल्ला झाला. सर्व स्फोटके पाकिस्तानातून आली होती. दहा दिवस स्फोटकांचे वाहन फिरत होते. मात्र यंत्रणेने लक्ष दिले नाही.

पुलवामा हल्ल्याबाबत मी तक्रार केली तेव्हा तीन वेळा माझ्या चौकशीसाठी लोक आले. मी म्हटलो मी भिकारी आहे. माझ्याकडे काही नाही. अधिकारी म्हणाले, ते काम करताहेत, त्यांचीही मजबुरी आहे.

जातनिहाय जनगणना आणि अनेक संस्थांमध्ये ओबीसी, दलित, आदिवासी नाहीत, असे विचारले असता मलिक म्हणाले की, लोहिया म्हणाले होते की, गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ४८ टक्के उच्च जातीचे लोक इच्छा नसतानाही सामील होत असत. आता ही व्यवस्थाच बनली आहे. सर्वांची टक्केवारी सर्वत्र निश्चित करावी लागेल.

मणिपूर हिंसाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमध्ये सरकारचे नियंत्रण नाही. मुख्यमंत्र्यांना काही करता येत नाही. त्यांना हटवले पाहिजे. निवडणुकीला फक्त ६ महिने उरले आहेत. मी लिहून देतो, की आता मोदी सरकार येणार नाही.

आरएसएस

आरएसएस विचारसरणीबाबतच्या प्रश्नावर मलिक म्हणाले की, उदारमतवादी हिंदू धर्माचा मार्ग अवलंबला तरच भारत एक देश म्हणून टिकेल. ही गांधींची दृष्टी होती. या विचारसरणीवर चालला तरच देश चालेल, नाहीतर त्याचे तुकडे होतील. आपल्याला न भांडता एकत्र राहायचे आहे.

इतर मुद्यांवर भाष्य

मलिक म्हणाले, महिला आरक्षणातून महिलांना काही मिळणार नाही. पण किती मोठे काम केले, हे मोदींनी दाखवून दिले आहे. नवीन संसदेची गरज नव्हती, पण मोदींनी ती बांधली. जुनी इमारत अजून बरीच वर्षे टिकली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT