Prashant Kishor Dainik Gomantak
देश

Bihar Politics: प्रशांत किशोर म्हणाले, "महात्मा गांधींना दारुबंदी कधीच नको होती"

Prashant Kishor: महात्मा गांधी कधीही दारुबंदीच्या बाजूने नव्हते, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी स्पष्ट केला.

Manish Jadhav

Bihar Politics: महात्मा गांधी कधीही दारुबंदीच्या बाजूने नव्हते, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी स्पष्ट केला. दारुबंदीमुळे बिहारचे खूप नुकसान होत आहे, त्यामुळे बिहारमधून दारुबंदी तात्काळ हटवावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जन सूरज पदयात्रेत सिवानच्या गोरियाकोठीला पोहोचलेले किशोर म्हणाले की, 'दारुबंदी हटवली पाहिजे, असे मी खुल्या व्यासपीठावरुन रोज सांगतो. मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलो आहे की, दारुबंदी बिहारसाठी (Bihar) कधीही फायदेशीर नाही, त्याचे फक्त तोटे आहेत.'

''संपूर्ण जगात असे उदाहरण नाही..."

कोणत्याही राज्याने, कोणत्याही देशाने दारुबंदीच्या माध्यमातून सामाजिक राजकारणाचे उदात्तीकरण केल्याचे जगात उदाहरण नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी यावेळी केला. कोणाचेही नाव न घेता पीके यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर निशाणा साधला. किशोर पुढे म्हणाले की, जो कोणी म्हणतो की गांधीजी दारुबंदीबद्दल बोलले आहेत, मी ते पूर्णपणे नाकारतो.'

गांधीजी हे कुठे म्हणाले होते?

सरकारने दारुबंदीची अंमलबजावणी करावी, असे गांधीजींनी कुठे म्हटले आहे, असा दावा करणाऱ्यांनी मला आणून दाखवावे, असे आव्हान प्रशांत किशोर यांनी केले. 'दारु पिणे ही वाईट गोष्ट आहे, ती थांबवण्यासाठी समाजाने प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी निश्चितपणे म्हटले आहे. कायदा करुन दारुबंदीची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी कधीच म्हटले नाही,' असेही यावेळी किशोर म्हणाले.

विशेष म्हणजे, किशोर सिवानच्या सादीपूर पंचायतीमध्ये असलेल्या पदयात्रा शिबिरात जन सूरज पदयात्रेच्या 132 व्या दिवसाची सुरुवात सर्वधर्मीय प्रार्थनेने झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT