Bihar: भ्रष्टाचार! बिहारमध्ये तब्बल 13 कोटीचा पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला

Bihar Bridge Collapse: बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या आणि चोरीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. बिहारमधील पूल कोसळल्याची एक नवीन घटना बेगुसराय येथून समोर आली आहे.
Bihar Bridge Collapse
Bihar Bridge CollapseDainik Gomantak

Bihar Bridge Collapse: बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या आणि चोरीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. बिहारमधील पूल कोसळल्याची एक नवीन घटना बेगुसराय येथून समोर आली आहे, जिथे बुधी गंडक नदीवर बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला. मात्र, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे. परंतु पूल कोसळल्याने नितीश कुमार सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, हा पूल (Bridge) कोसळण्याच्या दोन दिवस आधी त्यावरील लोकांची ये-जा बंद झाली होती. वास्तविक, या पुलाला एक तडा दिसला, त्यानंतर लोकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. बेगुसरायच्या डीएमने सांगितले की, पूल तात्पुरता वापरासाठी बंद करण्यात आला होता. पूल कोसळण्याच्या कारणांचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Bihar Bridge Collapse
Bihar: नीतीश कुमारांचा उत्तराधिकारी ठरला ! जाणून घ्या

हा पूल पाच वर्षांत बांधता आला नाही

या पुलाची कहाणी खूप रंजक आहे. हा एक उच्चस्तरीय RCC पूल होता, ज्याचे बांधकाम 2016 मध्ये सुरु झाले होते. ऑगस्ट 2017 पर्यंत तो तयार व्हायचा होता. मात्र अद्याप या पुलाचे उद्घाटन झाले नसून त्यापूर्वीच तो कोसळला. हा पूल मुख्यमंत्री नवार्ड योजनेंतर्गत 13.43 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. हा पूल अहोक कृती टोल आणि विष्णुपूर दरम्यान बांधण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाकडे जाणारा अ‍ॅप्रोच रोड तयार झाला नव्हता. मात्र, या पुलावरुन ट्रॅक्टरचीही ये-जा सुरु होती. काही काळापूर्वी त्यात एक तडा दिसला होता, त्यानंतर त्यावरील वाहतूकीवरही बंदी घालण्यात आली होती.

Bihar Bridge Collapse
Bihar Accident: बिहारमध्ये मोठा अपघात, भरधाव ट्रकने 30 जणांना चिरडलं

दुसरीकडे, लोक या पुलावरुन प्रश्न उपस्थित करत असून बांधकाम करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. हा पूल माँ भगवती कन्स्ट्रक्शन कंपनीने तयार केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com