Lashkar-e-Islam Dainik Gomantak
देश

काश्मिर पंडितांना लष्कर-ए-इस्लाम संघटनेची धमकी

''काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा''

दैनिक गोमन्तक

काही दिवासांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसत हत्या केली होती. यावरुन रस्त्यावर उतरत काश्मिरी पंडितांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. तसेच विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. याला काही दिवस होतात. तोवर पुन्हा एकदा लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना धमकी दिली आहे. काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार व्हा असे म्हटले आहे. (Lashkar-e-Islam threatens Kashmiri Pandits)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. या पत्रात लिहले आहे कि, ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी काश्मिर सोडून जावे, अन्यथा मरायला तयार व्हा.

काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्राईल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट केली, तरीही तुम्ही मरणार’ अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

राहुल भट्ट नामक युवकाला दहशतवाद्यांनी केले ठार

काही दिवसांपूर्वीच एका दहशतवादी संघटनेने राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडून हत्या केली होती. सरकारी कार्यालयात काम करत असताना दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राहुल यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित आक्रमक झाले होते. रस्त्यावर उतरत काश्मिरी पंडितांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोपही लावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT