पंतप्रधान मोदी नेपाळ दौऱ्यावर; लुंबिनी येथे महामाया देवीचे घेतले दर्शन

लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदी आणि देउबा यांची चर्चा होणार आहे.
Modi in Nepal
Modi in Nepal Dainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये पोहचले आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी मोदींचे स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम महामाया देवीचे दर्शन घेतले. (PM Narendra Modi on Nepal tour)

Modi in Nepal
'हिंसाचाराच्या घटनांमागील आरोपी RSS आणि भाजपचे सदस्य'

यावेळी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांची पत्नी पीएम मोदींसोबत उपस्थित होते. आता मोदी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध संस्कृती आणि हेरिटेज सेंटरच्या पायाभरणीसाठी आयोजित समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

Modi in Nepal
शिक्षणासाठी चिमुकल्याची धडपड; मुख्यमंत्र्यांना हात जोडून केली विनंती

सात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले की, भारतीय पंतप्रधानांच्या लुंबिनी दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट होतील.

देउबा आणि मोदींची चर्चा
लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदी आणि देउबा यांची चर्चा होणार आहे. जलविद्युत आणि कनेक्टिव्हिटीसह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर दिला जाईल. इंडियन इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या पायाभरणीलाही मोदी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Man Cuts Private Part Temple
Why did Mamata Banerjee lose in Bhawanipur
Ratan Ranjan Mamata Banerjee Mimicry
Maharashtra Gujarat Day 2026 New York:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com