'हिंसाचाराच्या घटनांमागील आरोपी RSS आणि भाजपचे सदस्य'

असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील विविध राज्यात होत असलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गेहलोत यांनी आरोप केला आहे की, हिंसाचाराचे आरोप असलेले लोक आरएसएस-भाजप आहेत. (RSS and BJP members responsible for communal violence says Rajasthan CM Ashok Gehlot)

Ashok Gehlot
बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी आज नेपाळ दौऱ्यावर

भारतीय जनता पक्ष हिंसक घटनांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अशोक गेहलोत म्हणाले, 'विविध राज्यांतील हिंसाचाराच्या घटनांमागील आरोपी हे आरएसएस आणि भाजपचे आहेत, इटलीचे नाही.' अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, दंगलीचा फायदा कोणाला होतो? दंगलीचा फायदा ज्या पक्षाला होतो, तोच दंगली घडवून आणतो हे समजून घ्या. दंगलीच्या माध्यमातून काँग्रेसला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे देखील ते म्हणाले.

Ashok Gehlot
शिक्षणासाठी चिमुकल्याची धडपड; मुख्यमंत्र्यांना हात जोडून केली विनंती

गेहलोत म्हणाले की, देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे, तणावाचे वातावरण आहे, हिंसाचाराचे वातावरण आहे, प्रत्येक धार्मिक मिरवणुकीच्या वेळी दंगली उसळत आहेत आणि जिथे निवडणुका होतात तिथे आणखी भडका उडू लागतो. गेहलोत यांनी उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरावरही भाष्य केले. ते म्हणाले की, 3 दिवसीय शिबिरात दाखवलेले गांभीर्य आणि आस्था, घेतलेले निर्णय, त्यांची नव्याने अंमलबजावणी होईल आणि काँग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून समोर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com