David Dsouza Murder Case Dainik Gomantak
देश

Congress Leader Murder: काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या! हल्लेखोर बाईकवरून आले, गोळ्या झाडल्या अन्... पोलिसांच्या चकमकीनंतर मुख्य शूटर जेरबंद, दोघे फरार

David Dsouza Murder Case: कर्नाटकात काँग्रेस नेते आणि व्यावसायिक डेव्हिड डिसूझा यांच्या हत्या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Sameer Amunekar

कर्नाटकात काँग्रेस नेते आणि व्यावसायिक डेव्हिड डिसूझा यांच्या हत्या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर फरार झालेल्या मुख्य शूटरला पोलिसांनी चकमकीनंतर ताब्यात घेतले आहे. बिंदूरजवळील ओट्टिनने परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी आणि पोलिस अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीच्या पायाला लागली गोळी

पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीची ओळख राजू अशी असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला पकडण्यासाठी पथकाने कारवाई केली असता त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये राजूच्या उजव्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिकारीही जखमी

या कारवाईदरम्यान पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. चकमकीदरम्यान नेमकी परिस्थिती कशी निर्माण झाली, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, प्रकरणातील अन्य दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

7 ऑगस्टला भरदिवसा हत्या

डेव्हिड डिसूझा यांची 7 ऑगस्ट रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते काँग्रेसशी संबंधित नेते असण्यासोबतच व्यवसाय आणि कंत्राटदारी क्षेत्रातही कार्यरत होते. तसेच त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचे अध्यक्षपदही भूषवले होते.

घटनेच्या दिवशी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी डिसूझा यांच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला.

आर्थिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

व्यवसाय, वैयक्तिक व्यवहार आणि इतर संभाव्य कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या हत्येमागील कट आणि इतर आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

CCTV आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी

हत्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोर कोणत्या दिशेने आले आणि घटनेनंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा शोध फुटेजच्या आधारे घेतला जात आहे.

त्याचबरोबर घटनास्थळावरून मिळालेल्या भौतिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचीही तपासणी सुरू आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, हल्लेखोरांचे संपर्क आणि हत्येच्या कटामागील इतर व्यक्ती याबाबत पोलिस माहिती गोळा करत आहेत.

मुख्य शूटर पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, हत्येचा अंतिम हेतू आणि इतर दोन फरार आरोपींची भूमिका तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT