Goa Drug Trafficking: राज्यात ड्रग्स तस्करीवर जोरदार 'प्रहार', विविध ठिकाणी कारवाई; 12 अटकेत, 10 गुन्हे दाखल, मोठा साठाही जप्त

Goa Drug Seizure: पोलिसांनी शुक्रवारी रात्री राज्यभरात ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबवून अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी साखळी आणि इतर बेकायदेशीर कारवायांविरोधात व्यापक कारवाई केली.
Goa Drug Trafficking
Goa Drug TraffickingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिसांनी शुक्रवारी रात्री राज्यभरात ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबवून अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी साखळी आणि इतर बेकायदेशीर कारवायांविरोधात व्यापक कारवाई केली. या मोहिमेत ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून १२ जणांना अटक करून अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार १० गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, एलएसडी, कोकेन, चरस, केटामाइन आणि एक्स्टसी गोळ्यांचा समावेश आहे. वैध व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

थिवी आणि मडगाव रेल्वे स्थानकांवर विशेष श्वान पथकाच्या मदतीने संशयित बॅगा व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. कोकण रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील ११ गाड्यांचीही झडती घेण्यात आली.

Goa Drug Trafficking
E20 Fuel Goa: "गोव्यात आपचं सरकार आल्यास 5 दिवसांत ई-20 इंधन बंद करणार!" केजरीवालांची गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा

१२० बसेसची तपासणी; ५० मद्यपी चालकांवर गुन्हे

महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक-गोवा मार्गावर धावणाऱ्या १२० हून अधिक आंतरराज्य बसेसची तपासणी करण्यात आली. यावेळी ५०० हून अधिक प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

किनारपट्टी पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी अचानक छापे टाकून बेकायदा वाळू उपसा आणि अन्य अवैध कृत्यांविरोधात कारवाई केली. राज्यभर नाकाबंदी करून १,००० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

नावेलीतील घरावर छापा

कोलवा पोलिसांनी गांजा प्रकरणी अटक केलेल्या इस्साक पेरेरा (२९) याच्या नावेली येथील घरावर शनिवारी पहाटे छापा टाकून आणखी ४ किलो ४७० ग्रॅम गांजा जप्त केला. आतापर्यंतच्या कारवाईत त्याच्याकडून ८ किलो गांजा हस्तगत केला आहे.

६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी भाटीवाडा-केळशी येथे इस्साक याला अटक करून त्याच्याकडून ३.६ किलो गांजा जप्त केला होता. सध्या तो सात दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. चौकशीत त्याने हा गांजा ओडिशातून आणल्याची कबुली दिली.

Goa Drug Trafficking
Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

माईण-कोरगावात ७.६५ लाखांचा ड्रग्ससाठा जप्त

माईण-कोरगाव येथे पेडणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून भाड्याच्या घरात राहणाऱ्या ॲरन मनोज गोम्स (४१) आणि झकारिया मोहम्मद इशाक (३५) यांच्याकडून ७ लाख ६५ हजार ६०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.

या कारवाईत ८१ ग्रॅम चरस, ३.१२ ग्रॅम एलएसडी ब्लॉट पेपरचे १३० तुकडे आणि एक्स्टसी पावडर हस्तगत करण्यात आली. ॲरन गोम्स हा मूळचा मालाड, मुंबई येथील असून झकारिया मोहम्मद इशाक हा वर्धा, महाराष्ट्र येथील आहे. तो सध्या थोरले बाग-केळी येथे राहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com