IPL 2026 Dainik Gomantak
देश

चेन्नई सुपर किंग्जमध्ये संजू सॅमसनची एन्ट्री? अश्विन-दुबे राजस्थानकडून खेळणार? IPL 2026 मध्ये पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

IPL 2026 Rumours: क्रिडाविश्वातून एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sameer Amunekar

Sanju Samson Trade to CSK

क्रिडाविश्वातून एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इनसाइडस्पोर्टच्या अहवालानुसार, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो. विशेष म्हणजे या करारासाठी चेन्नईकडून रविचंद्रन अश्विन आणि शिवम दुबे या दोन खेळाडूंना राजस्थानकडे पाठवले जाऊ शकते.

केरळचा हा यष्टीरक्षक फलंदाज सध्या चर्चेत आहे, कारण त्याच्या एजंटला एका अशाच पोस्टवर लाईक करताना पाहण्यात आले होते, ज्यात लिहिले होते की संजू सॅमसन पुढील हंगामात सीएसकेमध्ये सामील होऊ शकतो.

अश्विनचे जवळचे मानले जाणारे क्रिकेट विश्लेषक प्रसन्ना अघोरम यांनीही या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या एका भारतीय ऑफ-स्पिनर आणि डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाच्या जागी टॉप-ऑर्डर यष्टीरक्षक फलंदाजाला घेण्याचा विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर संजू सॅमसनचे नाव पुढे येत आहे.

Prasanna Agoram Post

अश्विन पुन्हा राजस्थानमध्ये?

रविचंद्रन अश्विन, जो आधी सीएसकेकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. तो पुन्हा राजस्थानकडे वळू शकतो. २०२५ च्या हंगामात तो नऊ सामन्यांत केवळ सात विकेट्स घेऊ शकला होता, परंतु राजस्थानसाठी त्याची कामगिरी याआधी अधिक प्रभावी ठरली आहे. त्यामुळे आरआर पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवू शकते.

शिवम दुबेच्या नावाचीही चर्चा

दुसरीकडे, डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून शिवम दुबेचे नाव चर्चेत आहे. दुबेने २०२४ च्या हंगामात सीएसकेसाठी १४ सामन्यांत ३५७ धावा केल्या होत्या, आणि त्याची स्ट्राइक रेट आणि फिनिशिंगची शैली संघासाठी फायदेशीर ठरली होती. तरीदेखील जर संजू सॅमसनसारखा टॉप ऑर्डर यष्टीरक्षक मिळत असेल, तर सीएसके दुबेच्या बदल्यात तो निर्णय घेऊ शकतो.

सध्या दोन्ही फ्रँचायझीमध्ये या संभाव्य डीलवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही अदलाबदल झाल्यास आयपीएलच्या आगामी हंगामात मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: आमचा अर्थसंकल्‍प चतुर्थीच्‍या माटोळीसारखा!

Goa Rain: गोवेकरांनो सावधान! राज्यात रेड अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Watch Video: जिद्दी कुंबळे! तुटलेला जबडा घेऊन खेळला अन् लाराची विकेट घेतली; भारतीय क्रिकेट इतिहासातील 'तो' ऐतिहासिक क्षण

Teen Steals ₹95 Lakh:बाबांचा मृत्यू, आई दिल्लीत असताना लहान मुलाने घरातून चोरी केले 95 लाख, मित्रासोबत निघाला होता गोव्याला; विमानतळावर घेतले ताब्यात

Record-Breaking Win:टेनिस क्वीन व्हीनस विल्यम्सची कमाल! 22 वर्षांनी लहान खेळाडूला नमवून जिंकला सामना; अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू

SCROLL FOR NEXT