Kashmir Dainik Gomantak
देश

टीव्ही कलाकार अमरीन भटच्या मृत्यूचा लष्कराने घेतला बदला, 3 दिवसांत 10 दहशतवादी ठार

काश्मीर (Kashmir) खोऱ्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दैनिक गोमन्तक

काश्मीरमध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या मृत्यूचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. स्वतः आयजीपी काश्मीर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, 'टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांच्या निर्घृण हत्येची 24 तासांत उकल झाली. काश्मीर खोऱ्यात 3 दिवसांत जैश-ए-मोहम्मदच्या 3 आणि लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) 7 जणांसह 10 दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते, ज्यांनी बुधवारी एका महिला टीव्ही कलाकाराची हत्या केली. पोलीस महानिरीक्षक (Kashmir Zone) विजय कुमार यांनी ट्विट करत म्हटले होते की, “दिवंगत कलाकार अमरीन भट (LET terrorists) यांचे दोन्ही मारेकरी अवंतीपोरा चकमकीत पकडले गेले आहेत. पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.”

तसेच, मरीन भट या टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार यांची बुधवारी बडगाम जिल्ह्यातील चदूरामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचा 10 वर्षांचा पुतण्या या हल्ल्यात जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील अगन हांजीपुरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT