काश्मीरच्या या दहशतवादी संघटनेने घेतली TV अभिनेत्री अमरीन बटच्या हत्येची जबाबदारी

दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन बट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या केली
Amreen Bhat Murder Case
Amreen Bhat Murder CaseTwitter

जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या सुरूच आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या केली, ज्याची जबाबदारी आता पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली आहे. याशिवाय आता सुरक्षा दलांनी या हत्येप्रकरणी परिसरात छापे टाकण्यास सुरुवात केली असून, अभिनेत्रीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. (Amreen Bhat Murder Case)

बुधवार 25 मे रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात टीव्ही अभिनेत्रीची तिच्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती, तसेच तिच्या पुतण्यालाही जखमी केले होते. पोलिसांनी ही माहिती दिली. अमरीन भट यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत महिलेचा 10 वर्षांचा अल्पवयीन भाचा फरहान जुबेर हाही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

Amreen Bhat Murder Case
पुण्यात ATS ची मोठी कारवाई; एकास अटक

घटनेच्या वेळी तो घरीच होता आणि त्याच्या हाताला गोळी लागली होती अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या जघन्य गुन्ह्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करचे तीन दहशतवादी सामील आहेत. घटनेनंतर तत्काळ परिसराची नाकेबंदी करण्यात आली आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

अमरीनच्या निर्घृण हत्येनंतर तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांचे म्हणणे आहे की, ती टीव्हीवर काम करून काही पैसे कमवत असे आणि घर चालवण्यास मदत करत असे, परंतु दहशतवाद्यांनी निर्दयपणे तिची हत्या केली. मी स्वत: काही करू शकत नाही पण देव माझ्या मुलींच्या मारेकऱ्यांना शिक्षा देईल, असे दु:खद मत अमरीन यांच्या वजिलांनी व्यक्त केले आहे.

Amreen Bhat Murder Case
यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात दिल्ली-NCR मध्ये हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरीन बट यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले असून ही निर्घृण हत्या असल्याचे म्हटले आहे. याआधी मंगळवारी श्रीनगरमधील सौरा भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी त्यांची 7 वर्षांची मुलगी जखमी झाली. कॉन्स्टेबल सैफुल्लाह कादरी आपल्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com