Randhir Jaiswal Dainik Gomantak
देश

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

India Pakistan Relations: पाकिस्तानचा इतिहास हा स्वतःच्याच लोकांवर दमन करणे, क्रूरता दाखवणे आणि मानवाधिकाऱ्यांचे सर्रास उल्लंघन करणे असा राहिला आहे.

Manish Jadhav

Balochistan Violence: बलुचिस्तानमधील अशांततेसाठी भारताला जबाबदार धरणाऱ्या पाकिस्तानच्या आरोपांचा भारताने रविवारी (1 फेब्रुवारी) तीव्र शब्दांत निषेध करत ते पूर्णपणे फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, स्वतःच्या देशातील अंतर्गत अपयश आणि अराजकतेवरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारच्या जुन्या आणि बिनबुडाच्या युक्त्यांचा वापर करत असतो.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना सांगितले की, पाकिस्तानचा (Pakistan) इतिहास हा स्वतःच्याच लोकांवर दमन करणे, क्रूरता दाखवणे आणि मानवाधिकाऱ्यांचे सर्रास उल्लंघन करणे असा राहिला आहे. पाकिस्तानने पुरावे नसलेले दावे करण्यापेक्षा आपल्याच नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही भारताने दिला.

बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सुरक्षा दले आणि स्थानिक बलूच संघटनांमध्ये भीषण संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानी लष्कराने दावा केला की, त्यांनी राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत 92 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, यामध्ये 15 पाकिस्तानी सैनिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

शनिवारी बलूच संघटनांनी क्वेटा, मस्तुंग, नुश्की आणि पंजगुर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुनियोजित हल्ले केले होते, त्यानंतर लष्कराने ही मोठी कारवाई सुरु केली. या संघर्षात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, लष्करी मोहिमेत 67 बलूच अतिरेकी मारले गेल्याचे वृत्त सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिले. या भीषण हिंसाचारात केवळ सैनिकच नव्हे, तर पोलीस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनाही आपला प्राण गमवावा लागला आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला असला तरी, पाकिस्तान सरकार आणि लष्कर नेहमीप्रमाणे या हिंसाचाराचे खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने ठामपणे सांगितले की, जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये एखादी हिंसक घटना घडते, तेव्हा स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी ते भारताचे नाव घेतात.

बलुचिस्तानमधील (Balochistan) जनता दीर्घकाळापासून आपल्या हक्कांसाठी आणि स्वायत्ततेसाठी लढा देत आहे, परंतु पाकिस्तान सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी लष्करी बळाचा वापर करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानचा हा खोटा चेहरा उघड केला असून पाकिस्तानचे हे आरोप केवळ त्यांच्या नैराश्यातून आलेले आहेत, असे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

Goa Assembly Election 2027: भाजप-मगोप युतीचेच सरकार राज्यात पुन्हा येणार, सदानंद शेट तानावडेंनी व्यक्त केला विश्वास; विकासाला मिळणार नवी गती

SCROLL FOR NEXT