Balochistan: ..पाकिस्तानचे सैन्य म्हणजे धंदेवाईक खुन्यांचा गट! TTP प्रवक्त्याचे आरोप; 39 ठिकाणी हल्ल्यांचा BLA चा दावा

Attacks On Pakistan Army: भारतीय संरक्षण दलांनी हल्ल्यांची तीव्रता वाढविलेली असताना, बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी सैन्याला जोरदारपणे लक्ष्य करण्यात येत आहे.
Balochistan Pakistan Attack
Balochistan Pakistan TensionX
Published on
Updated on

नवी दिल्ली : ‘तेहरिके तालिबान पाकिस्तान’च्या दहशतवाद्यांनी दक्षिण वझिरीस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये २० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. शाकाई भागातील एका चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

यात २० सैनिक ठार झाले, तर पाच जखमी झाले, असा दावा या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानचे सैन्य म्हणजे धंदेवाईक खुन्यांचा गट आहे. ते पाश्चिमात्य देशांच्या हातातील बाहुले आहे, असे या संघटनेचा स्वयंघोषित प्रवक्ता महंमद खोरासनी याने केला आहे.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका
Israel-Iran WarDainik Gomantak

भारतीय संरक्षण दलांनी हल्ल्यांची तीव्रता वाढविलेली असताना, बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी सैन्याला जोरदारपणे लक्ष्य करण्यात येत आहे. बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत ३९ ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचा दावा ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) केला आहे.

Balochistan Pakistan Attack
Balochistan: पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे होणार? बलुच आर्मीचा एक तृतीयांश भागावर कब्जा, पाक सैन्यांवर हल्ले सुरुच

कलाट जिल्ह्यातील मंगोचर शहरावर ‘फतेह स्क्वाड’ने कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, खाझिनाई महामार्ग रोखण्यात आला असून, एके ठिकाणी स्थानिक पोलिसांनाही काही काळ ताब्यात घेण्यात आले होते. या पोलिसांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘आम्ही वेगवेगळ्या ३९ ठिकाणी हल्ले केले असून, या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत आहोत. यातील काही ठिकाणी चकमकी अजूनही सुरूच आहेत,’ असे ‘बीएलए’चा प्रवक्ता जीयांद बलोच याने सांगितले.

Balochistan Pakistan Attack
Balochistan: स्वतंत्र 'बलुचिस्तान’! सोशल मीडियावर मागणीचा संदेश Viral; मोठ्या भागावर ताब्याचा दावा

बलुचिस्तानातील खनिज संपत्तीच्या वाहतुकीला संरक्षण देणाऱ्या लष्करी वाहनांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात येत आहे. याशिवाय, पोलिस स्थानके ताब्यात घेणे, महामार्ग रोखणे, खबऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे, असेही त्याने सांगितले. तसेच, बलुचिस्तानातील नैसर्गिक साधन संपत्तीची अशाच पद्धतीने चोरी होत असेल आणि लष्करी अत्याचार सुरू राहिले, तर आणखी हल्ले करण्यात येतील, असा इशाराही त्याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com