Indian National Development Inclusive Alliance Dainik Gomantak
देश

Political Update: विरोधी एकजुटीला झटका! I.N.D.I.A. युतीचे 'हे' दिग्गज नेते पीएम मोदींसोबत...

Sharad Pawar News: इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्सची (I.N.D.I.A.) तिसरी बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होणार आहे.

Manish Jadhav

Sharad Pawar News: इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्सची (I.N.D.I.A.) तिसरी बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होणार आहे. पण त्याआधी I.N.D.I.A. युतीला मोठा झटका बसला आहे.

खरे तर, राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेज शेअर करणार आहेत. यावर I.N.D.I.A. युतीच्या काही नेत्यांनी चिंता व्यक्त करत हे युतीसाठी चांगले नसल्याचे म्हटले आहे.

I.N.D.I.A. युतीला ही चिंता नेत्यांना सतावत आहे

एका सूत्राने सांगितले की, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे प्रमुख पाहुणे असल्याने I.N.D.I.A. ब्लॉकच्या नेत्यांच्या बैठकीत काही सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधी एकजुटीला धक्का बसू शकतो.

खर्गे शरद पवारांना मनवणार!

दुसरीकडे, काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलू शकतात आणि त्यांना पुण्यातील कार्यक्रमाला न जाण्याचे आवाहन करु शकतात, असेही सूत्राने सांगितले.

पक्षाच्या सूत्राने सांगितले की, I.N.D.I.A. युती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समविचारी विरोधी पक्ष एकत्र येत असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर केल्याने त्याचा वाईट परिणाम होईल, असे युतीच्या काही नेत्यांना वाटत आहे.

I.N.D.I.A. काय नुकसान होईल?

सूत्रानुसार, पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर करुन शरद पवार I.N.D.I.A. युतीच्या प्रतिमेला हानी पोहोचवतील आणि जनतेत चुकीचा संदेश जाईल. टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या समारंभात खुद्द शरद पवार पंतप्रधान मोदींना पुरस्कार प्रदान करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT